चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; १४ लाखांचं होतं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 08:18 AM2023-04-23T08:18:41+5:302023-04-23T08:19:35+5:30

प्रत्येकी १४-१४ लाखांचे होते बक्षीस

Two Jahal women Naxalites were killed in the encounter | चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; १४ लाखांचं होतं बक्षीस

चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; १४ लाखांचं होतं बक्षीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यातील जंगलात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ३ च्या सुमारास पोलिस-नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यामध्ये दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. सुनीता उर्फ सोनडी मडावी आणि सरिता अशी त्यांची नावे असून, दोघींवर प्रत्येकी १४-१४ लाख रुपयांचे बक्षीस होते.  

पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांच्या माहितीनुसार, गढी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ठार झालेल्यांपैकी सुनीता टाडा दलमच्या भोरम देव एरिया कमांडरमध्ये होती. ती सध्या विस्तार दलममध्ये काम करीत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची गार्ड होती. ती खटिय मोचा दलममध्ये होती. तीदेखील विस्तार दलममध्ये होती.

बंदुका, खाद्यपदार्थ जप्त
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळ असलेल्या बंदुका, काडतुसे, इतर साहित्य व खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. गेल्या वर्षीही मध्य प्रदेश पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. 

Web Title: Two Jahal women Naxalites were killed in the encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.