धुलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला; दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 05:31 PM2022-03-19T17:31:07+5:302022-03-19T17:36:06+5:30

मुंगली शिवारजवळ नवेगावबांध-सानगडी मार्गावर येरणे राईस मिल समोर दोन्ही मोटारसायकलची जबरदस्त धडक झाली.

two killed as bikes collide each other near mungli area | धुलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला; दुचाकी अपघातात दोन ठार

धुलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला; दुचाकी अपघातात दोन ठार

Next
ठळक मुद्देनवेगावबांध-सानगडी मार्गावरील घटना

नवेगावबांध (गोंदिया) : भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघे ठार झाले. शुक्रवारी (दि.१८) धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेदरम्यान मुंगली शिवारात येरणे राईस मिल समोर ही घटना घडली. लक्षित विठ्ठल वाघाडे (३८,रा. भिवखिडकी) व ओमप्रकाश महादेव दोनोडे (३८, रा. डोंगरगाव साक्षर, भंडारा) असे मृतांचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,सावरटोला येथील रहिवासी शंकर देवराम भेंडारकर (४१) व ओमप्रकाश दोनोडे हे मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एन ६९८४ ने सायंकाळच्या सुमारास नवेगावबांध वरून सावरटोला येथे स्वगावी जाण्यास निघाले होते. तर मिथुन वामन मरसकोल्हे (२५ ,रा.भिवखिडकी) हा लक्षित वाघाडे याच्या मोटारसायकलने (एमएच ३५-एएन ७१८८) नवेगावबांधला जात होते. मात्र मुंगली शिवारजवळ नवेगावबांध-सानगडी मार्गावर येरणे राईस मिलसमोर दोन्ही मोटारसायकलची जबरदस्त धडक झाली.

अपघातानंतर मोटारसायकलस्वार रस्त्यावर अस्ताव्यस्त जखमी अवस्थेत पडलेले होते. अपघाताची माहिती मिळताच लोकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेतले व त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान लक्षित वाघाडे याचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी ओमप्रकाश दोनोडे याचा उपचारादरम्यान भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

शंकर भेंडारकर याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन डावा हात तुटला, पायाला व डोक्याला जखम झाली आहे. मृतांच्या डोक्याला गंभीर इजा असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार जनार्दन हेगडकर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. नवेगावबांध पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.

Web Title: two killed as bikes collide each other near mungli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.