केटीएसच्या दोन कर्मचाऱ्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:52+5:302021-05-09T04:29:52+5:30
गोंदिया : कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन ...
गोंदिया : कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्या दोन कर्मचाऱ्यांना ९ मे पर्यंत पाेलीस कोठडी सुनावली आहे.
केटीएस रुग्णालयातील सफाई कामगार सागर पटले रा. मोठा रजेगाव हा विनापरवाना रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रुपये दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले यासंदर्भात विचारणा केली असता केटीएस रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) अशोक उत्तमराव चव्हाण रा. शास्त्रीवाॅर्ड गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. या दोघांविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४ सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्या दोघांना न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.