लॉटरीसाठी दोन लाख १३ हजारांनी गंडविले

By admin | Published: October 20, 2016 12:19 AM2016-10-20T00:19:16+5:302016-10-20T00:19:16+5:30

आपल्याला लॉटरी लागली, त्यासाठी खाते उघडा व टॅक्स स्वरूपात २ लाख १३ हजार रुपये भरा, असे सांगून अज्ञात आरोपींनी फुलचूरटोलाच्या सहायता नगरातील...

Two lakh 13 thousand people were looted for the lottery | लॉटरीसाठी दोन लाख १३ हजारांनी गंडविले

लॉटरीसाठी दोन लाख १३ हजारांनी गंडविले

Next

आरोपी अज्ञात : जबलपूर-अमरावती एक्सपे्रसमधून वाहतूक
बडनेरा : जबलपूर-अमरावती एक्सप्रेस मधून रेल्वे पोलिसांनी बेवारस असणाऱ्या दोन बॅगमधील १८ किलो गांजा ताब्यात घेतला. याची किंमत १ लाख ८० हजार रुपये ऐवढी आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी १८ आॅक्टोंबर रोजी उशिरा रात्री एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबलपूर-अमरावती एक्सप्रेस मंगळवारी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्राप्त माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी सामान्य डब्यातून दोन एअर बॅग ताब्यात घेतल्या. या गाडीतून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. एका बॅगेत ६ तर दुसऱ्या बॅगेत १२ किलो गांजा आढळला. हा गांजा महागड्या एअर बॅगमधून आणल्या गेला. प्रवाशांना किंवा पोलिसांना गांजा तस्करी होत असल्याचा संशय येणार नाही, अशी शक्कल तस्करांनी लढविली होती. ज्या बॅगमध्ये गांजा आणला गेला तो कपड्यांमध्ये गुंडाळून होता. १८ किलो गांजाची एकूण १ लाख ८० हजार रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र गांजा तस्कर पोलिसांच्या हाती लागले नाही. या कारवाईत रेल्वे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. चक्रे, उपनिरीक्षक दत्ता पेंडके, मदन वानखडे, राहुल हिरोडे, राजू वऱ्हाडे, दावत खशन, अरुण गोंदळे, विजय रेवेकर, संदीप भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नायब तहसीलदार धीरज मांजरे यासह इतर पक्षांसमक्ष ही कारवाई पूर्णत्वास नेली.

परप्रातांतून होते गांज्याची तस्करी
आतापर्यंत बऱ्याचदा रेल्वे किंवा शहर पोलिसांनी रेल्वेतून अवैधरित्या वाहून नेणारा गांजा पकडलेला आहे. अमरावती शहरात मोठात प्रमाणात रेल्वेने गांजा येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, उडीसा यासह इतरही राज्यातून गांजा मोठ्या प्रमाणात रेल्वे अमरावती शहरात आणला जातो. बऱ्याच प्रकरणात गांजा असणारे तस्कर पोलिसांच्या हाती लागलेले नाही. गांजाचा सुगंध रेल्वे डब्यांमध्ये दरवळत असल्याने प्रवाशांना या प्रकाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. गांजा तस्करीसाठी महिलांचा वापर होत असल्याची माहिती आहे.

Web Title: Two lakh 13 thousand people were looted for the lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.