ऑनलाइन व्यवहार करून दोन लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:54 AM2021-02-21T04:54:08+5:302021-02-21T04:54:08+5:30

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन कॉलनी येथील किशोर सुखदास राउत यांच्या घराजवळ, हिने भवनजवळून ऑनलाइन व्यवहार करण्याच्या ...

Two lakh wasted by online transactions | ऑनलाइन व्यवहार करून दोन लाखांना गंडविले

ऑनलाइन व्यवहार करून दोन लाखांना गंडविले

Next

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन कॉलनी येथील किशोर सुखदास राउत यांच्या घराजवळ, हिने भवनजवळून ऑनलाइन व्यवहार करण्याच्या नादात खळबंदा येथील अलंकार मानिकचंद कांबळे (३९) यांची दोन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. गुरुवारी (दि.१८) दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडलेल्या घटनेत कांबळे यांनी आपल्या ओळखीच्या मोबाइल क्रमांकावर आपल्या मोबाइलने फोन पेच्या माध्यमातून ९५० रुपये पाठविले होते, परंतु ते पैसे त्याला न मिळाल्याने कांबळे यांनी गुगल पेच्या कस्टमर केअरच्या मोबाइलवर संपर्क केला. त्या मोबाइलधारकाने फिर्यादीचा फोन पेचा ओटीपी घेऊन, तसेच योनो ॲप्सबाबत कांबळे यांच्या बँक अकाउंटची माहिती, युजर आयडी, त्याचा पासवर्ड, ओटीपी घेऊन त्यांच्या एसबीआय बँक अकाउंटमधील एक लाख ९९ हजार ७१२ रुपये ऑनलाइन ट्रान्जेक्शन करून काढून घेतले. कांबळे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायदा कलम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.

Web Title: Two lakh wasted by online transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.