दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:13 PM2019-07-17T22:13:36+5:302019-07-17T22:13:51+5:30
रेल्वे सुरक्षा बलाच्या स्पेशल टॉस्क चमूचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एम.पी.राऊत, मुख्य आरक्षक मडावी, आर.के. रेकवार, पी.दलाई, ठाकुर, आरक्षक नाशीर खान, लांजेवार, बंधाटे व रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, आरक्षक चंद्रकांत भोयर यांनी दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे सुरक्षा बलाच्या स्पेशल टॉस्क चमूचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एम.पी.राऊत, मुख्य आरक्षक मडावी, आर.के. रेकवार, पी.दलाई, ठाकुर, आरक्षक नाशीर खान, लांजेवार, बंधाटे व रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, आरक्षक चंद्रकांत भोयर यांनी दोन मोबाईल चोर व एका पाकीटमाराला रंगेहात पकडले.
बालाघाट येथील गोविंदा दमाहे (३०) याने १६ जुलै रोजी केलेल्या तक्रारीनुसार ते रायपूर गोंदिया प्रवास केल्यानंतर बालाघाट जाण्यासाठी गाडीची वाट पाहात फलाट क्र. ३ वर ते आराम करीत असताना यावेळी बाजूला असलेल्या व्यक्तीने त्यांचे पाकीट चोरले. त्यात ४ हजार रूपये, पॅनकार्ड व पासपोर्ट फोटो ठेवले होते. दरम्यान पोलिसांनी पाकीटमाराची तपासणी केली असता दसखोली गोंदिया येथील मनीष उर्फ बुच्ची मन्नू कुलदीप (२१) ला पकडण्यात आले.त्याच्याजवळ पर्स आढळला. पर्स, पॅनकार्ड व पासपोर्ट जप्त करण्यात आले. आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले आहे. स्पेशल टॉस्क चमूच्या सदस्यांनी रायपूर येथे दोन विधि संघर्षीत बालकांना पकडले.यात एक रामनगर बैरागी मोहल्ला रायपूर येथील १६ वर्षाचा तर दुसरा रायपूरच्या शीतलापारा येथील १७ वर्षाचा बालक आहे. गाडी क्र. ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजरच्या प्लेटफॉर्म नंबर ४ वर पोहचताच प्रवाशी चढत-उतरत असताना त्या ठिकाणी संशयास्पदरित्या आढळले. त्यांना पकडल्यावर त्यांच्याजवळ तीन मोबाईल आढळले.गर्दीचा फायदा घेऊन ते मोबाईल चोरी करीत होते. यासंदर्भात पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.