वाघ शिकार प्रकरणात आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:02+5:30
शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला,बालचंद सोनु राणे रा. चुटिया यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली. या अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्याच्या लोधीटोला येथील शेतशिवारात वाघाची करंट लावून शिकार करण्यात आली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.
शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला,बालचंद सोनु राणे रा. चुटिया यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली. या अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. या वनकोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी या प्रकरणाचा उलगडा केला.
यात आणखी दोन आरोपींना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली. यात छेदीलाल पटले (४५) रा. इंदिरानगर पिंडकेपार व बाबा शरणागत (५५) रा. चुटीया या दोघांना अटक करण्यात आली. आतापर्यंत वाघाच्या शिकारीत अटक झालेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. त्या दोन आरोपींना वनाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले आहे.