खासदार नेतेंकडून कोविड रुग्णांसाठी दोन प्राणवायू प्रणाली उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:37+5:302021-05-27T04:30:37+5:30

खासदार नेते यांनी तालुक्यातील कोविड नियंत्रण आढावा बैठक घेतली होती, यात रुग्णांना प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात ...

Two oxygen systems available for Kovid patients from MP leaders | खासदार नेतेंकडून कोविड रुग्णांसाठी दोन प्राणवायू प्रणाली उपलब्ध

खासदार नेतेंकडून कोविड रुग्णांसाठी दोन प्राणवायू प्रणाली उपलब्ध

Next

खासदार नेते यांनी तालुक्यातील कोविड नियंत्रण आढावा बैठक घेतली होती, यात रुग्णांना प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. खा.नेते यांच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने तालुक्यात प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी सार्थक पाऊल उचलले व अधिक प्रमाणात प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून दिले. खासदार नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथे भाजप कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री उत्तम नंदेश्वर, नगर भाजप अध्यक्ष सुगमचंद अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांना प्राणवायू सयंत्र कोविड रुग्णांना उपलब्ध करून दिले. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्ते कोविड रुग्णांना मदतीचे ध्येय ठेवून कार्य करीत आहेत, यात यथावत मदत केली जाईल, असे आश्वासित केले.

तालुक्यातील ज्या कोरोनाबाधितांची प्रकृती फारशी गंभीर नाही. मात्र, प्राणवायूची गरज आहे, अशा रुग्णांसाठी प्राणवायू प्रणाली दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गरजू नागरिकांना किंवा कोविडबाधित मात्र, गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्राणवायूची गरज असल्यास भाजप मंडळ पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे भाजप तालुका मंडळ यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: Two oxygen systems available for Kovid patients from MP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.