जिल्हाधिकाऱ्याच्या गनमॅनची एके-४७ पळविणाऱ्या दोन भावंडाना पाच वर्षाचा सश्रम कारावास

By नरेश रहिले | Published: December 16, 2022 05:23 PM2022-12-16T17:23:38+5:302022-12-16T17:27:11+5:30

गोंदिया : वडीलाची प्रकृती पाहण्यासाठी मूळ गावी गेलेल्या जिल्हाधिकारी यांचे गनमॅन पोलीस नायक शिपाई याच्या कारंजा येथील हिमगीरी लेआऊट ...

two siblings sentenced 5 years rigorous imprisonment for stealing AK-47 of Collectors gunman | जिल्हाधिकाऱ्याच्या गनमॅनची एके-४७ पळविणाऱ्या दोन भावंडाना पाच वर्षाचा सश्रम कारावास

जिल्हाधिकाऱ्याच्या गनमॅनची एके-४७ पळविणाऱ्या दोन भावंडाना पाच वर्षाचा सश्रम कारावास

Next

गोंदिया : वडीलाची प्रकृती पाहण्यासाठी मूळ गावी गेलेल्या जिल्हाधिकारी यांचे गनमॅन पोलीस नायक शिपाई याच्या कारंजा येथील हिमगीरी लेआऊट येथे असलेल्या खोलीवरून एके-४७ पळविले. या दोन भावंडाना प्रत्येकी पाच वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी ३ हजाराचा दंड सुनावला आहे. ही सुनावणी गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी १६ डिसेंबर रोजी केली आहे.

गोंदियाच्या कारंजा येथील हिमगिरी ले आउट, प्लॉट क्र. ६३ येथे राहणारे पोलीस नायक शिपाई ज्ञानेश्वर बकीराम औरासे (४२) बक्कल नंबर ६८८ हे ८ फेब्रुवारी २०१४ पासून गोंदियाचे जिल्हाधिकारी यांचे गनमॅन म्हणून काम करीत होते. २१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांना त्यांच्या भावाचा फाेन आला. वडिलाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितल्यामळे ते वडीलांना पाहण्यासाठी देवरी येथे गेले होते.

त्यांनी पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथील खोलीवर जिल्हाधिकारी यांच्या संरक्षणासाठी मिळालेले ए.के ४७ रायफल बट क्र. १३६ व जिवंत १२० काडतूस ठेवले होते. त्यापैकी ६० काडतूस, ए.के ४७ रायफल, त्यांच्या पत्नीला २० ग्रॅम वनाचा जुना वापरलेला हार किंमत ४० हजार, दोन कानातील टॉप्स ६ ग्रॅम वजनाचे किंमत १२ हजार असा ५२ हजाराचा माल आरोपी मनोहर योगेश्वर फरकुंडे (२२) व जितेंद्र योगेश्वर फरकुंडे (२९) दोन्ही रा.भोसा ता. आमगाव यांनी चोरी केला होता.

यासंदर्भात गोनदिया शहर पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर २०१४ ला भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, प्रवीण नावडकर, उमेश गिते यांनी केला होता. आरोपींना दोन कलमांत प्रत्येकी ५ वर्षाचा सश्रम कारावास सुनावला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकार सुनिल ताजने यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार रामलाल किरसान, ओमराज जामकाटे यांनी काम पाहिले.

१२ साक्षदार तपासले

या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर १२ साक्षदार तपासण्यात आले. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी आरोपींना शिक्षा सुनावणी केली.

अशी सुनावली शिक्षा

या प्रकरणातील आरोपी मनोहर योगेश्वर फरकुंडे (२२) व जितेंद्र योगेश्वर फरकुंडे (२९) दोन्ही रा.भोसा यांना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत तीन वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंड, कलम ४५७ व ३८० अंतर्गत दोघांना ५ वर्षाचा सश्रम कारावास व दोन्ही कलमांचे प्रत्येकी १ हजार प्रमाणे २ हजार रूपये दंड ठोठावला. दोघांना ६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: two siblings sentenced 5 years rigorous imprisonment for stealing AK-47 of Collectors gunman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.