चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
By नरेश रहिले | Published: November 20, 2023 06:45 PM2023-11-20T18:45:36+5:302023-11-20T18:46:59+5:30
शहर पोलिसांची कामगिर, चोरी गेलेल्या बॅटऱ्या हस्तगत.
गोंदिया: शहराच्या बाजपेयी चौकातील रंजीत शामराव पुराम यांच्या ट्रकची तर गणेश मयाराम मोहबे यांच्या ऑटोची बॅटरी चोरी करणाऱ्या दोघांना गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत राज उर्फ मारी शुशिल जोसफ (२०) व फरहान ईशाक कुरैशी (१९) दोन्ही रा. गौतमनगर, गोंदिया यांचा समावेश आहे.
१७ नोव्हेंबर रोजी त्या दोन्ही वाहनातून पळविलेल्या बॅटरींची किंमत १३ हजार रूपये सांगितली जाते. त्या चोरी संदर्भात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंग भाटीया, दिपक रहांगडाले, महिला पोलीस हवालदार रिना चौव्हाण, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी कारवाई केली आहे. तपास पो.हवा. कवलपालसिंग भाटीया करीत आहेत.