दुचाकीची पोलीस वाहनाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:47+5:302021-03-13T04:53:47+5:30
गोंदिया : महाशिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी जात असलेल्या पोलिसांच्या टाटा सुमोला दुचाकीने धडक दिली व यामध्ये दुचाकी चालक जखमी झाला. सडक-अर्जुनी ...
गोंदिया : महाशिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी जात असलेल्या पोलिसांच्या टाटा सुमोला दुचाकीने धडक दिली व यामध्ये दुचाकी चालक जखमी झाला. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम भुसारी टोला येथील बसस्थानकाजवळ ११ मार्च रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान ही घटना घडली.
टाटा सुमो क्रमांक एमएच ३५-डी ४५८ ने पोलीस कर्मचारी महाशिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी गोंदिया वरून कोहमारामार्गे प्रतापगड येथे जात होते. दरम्यान ग्राम भुसारी टोला येथील बसस्थानकाजवळ दुचाकी क्रमांक एमएच ३५-यु ०९६६ च्या चालकाने भरधाव वेगात पोलिसांच्या सुमोला धडक दिली. यात पोलिसांच्या सुमोचे ४० हजारांचे नुकसान झाले तर दुचाकीचालक स्वत: जखमी झाला. डुग्गीपार पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, सहकलम १८४, ११९, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भुरले करीत आहेत.