दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही

By admin | Published: November 26, 2015 01:41 AM2015-11-26T01:41:25+5:302015-11-26T01:41:25+5:30

गोंदिया नगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही.

For two years the administration has not been the official | दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही

दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही

Next

प्रभारीचीही बदली : पालिकेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर
गोंदिया : गोंदिया नगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर विभागाचा कारभार चालत होता. मात्र त्यांची जून महिन्यात बदली झाल्याने प्रशासन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर असून याचा दुष्परिणाम शाळांच्या कारभारावर पडत आहे.
पालिकेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मोजकेच विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद करण्याची पाळी नगर परिषदेवर आली आहे. याला पालिका प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार आहे. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त पडून आहे.
तत्कालीन प्रशासन अधिकारी मदारकर हे सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले व तेव्हापासूनच त्यांचे पद रिक्त पडून आहे. ते सेवानिवृत्त झाल्यावर प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार तिरोडाचे एस.एस.ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार प्रभारी अधिकारी चालवित होते. मात्र दोन्ही ठिकाणचे काम सांभाळताना त्यांची तारांबळ होत होती. परिणामी ते आठवड्यातून काही दिवस येथे येत होते. अशात एक ना धड भाराभर चिंध्या हीच गत प्राथमिक शिक्षण विभागाची झाली होती.

दोन लिपीक व दोनच शिपाई
विभागात आजघडीला दोन लिपीक व दोन शिपाई आहेत. यातील कनिष्ठ लिपीक पराते हे सध्या सुटीवर आहेत, तर दुसऱ्या लिपीक वासनिक यांच्याकडे बालकल्याण विभागाचा प्रभार आहे. यामुळे शिक्षण विभागात त्यांचे दर्शनच होत नाही. अशात शिपायांकडून विभागातील कामे करवून घेण्याची पाळी आली आहे. पराते यांच्याकडे विभागातील सर्व माहिती असते. मात्र ते सुटीवर गेल्यावर माहिती देणारा येथे कुणीच दिसून येत नाही.

Web Title: For two years the administration has not been the official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.