चूलबंद जलाशयात बुडून दोन युवकांचा मृत्यू, बंद असल्याने गेले होते फिरण्यासाठी; आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले

By अंकुश गुंडावार | Published: August 21, 2024 10:29 PM2024-08-21T22:29:55+5:302024-08-21T22:30:13+5:30

भारत बंद असल्याने कादीर मतीन शेख व केफ अमीन शेख हे बुधवारी आपल्या कुटुंबीयांसह चूलबंद जलाशय येथे सहलीकरिता गेले होते. दरम्यान कादीर व कैफ हे दोघेही जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या सांडव्याजवळ आंघोळ करण्यासाठी गेले.

Two youths died after drowning in Chulband reservoir. | चूलबंद जलाशयात बुडून दोन युवकांचा मृत्यू, बंद असल्याने गेले होते फिरण्यासाठी; आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले

चूलबंद जलाशयात बुडून दोन युवकांचा मृत्यू, बंद असल्याने गेले होते फिरण्यासाठी; आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले

सडक अर्जुनी (गोंदिया) : तालुक्यातील चूलबंद जलाशयात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २१) सायंकाळच्या सुमारास घडली. कादीर मतीन शेख (२८), कैफ अमीन शेख (२१) अशी जलाशयात बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नाव आहे.

भारत बंद असल्याने कादीर मतीन शेख व केफ अमीन शेख हे बुधवारी आपल्या कुटुंबीयांसह चूलबंद जलाशय येथे सहलीकरिता गेले होते. दरम्यान कादीर व कैफ हे दोघेही जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या सांडव्याजवळ आंघोळ करण्यासाठी गेले. सांडव्याजवळ आंघोळ करीत असतानाच कादीरचा तोल गेल्याने तो जलाशयात पडला. नेमका त्याच ठिकाणी डोह असल्याने तो बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी कैफने जलाशयात उडी घेतली. पण दोघेही बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

ही बातमी वाऱ्यासारखी मुरदोली गावात पसरली. नागरिकांनी या चूलबंध जलाशयाकडे धाव घेतली. याची माहिती पोलिस पाटील दिलीप मेश्राम व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करुन दोन्ही तरुणाचे मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Two youths died after drowning in Chulband reservoir.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.