राष्ट्रीय पातळीवर दंडारकला जोपासणारे उद्धवराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:44 PM2017-12-31T23:44:24+5:302017-12-31T23:44:36+5:30

पोटासाठी सारेच झटतात परंतु कलेसाठी जीवनातील सुख बाजूला सारुन झाडीपट्टीतील लोककला राष्टÑीय पातळीवर जिवंत ठेवणाºया उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाला सारेच सलाम करीत आहेत.

 Uddhavra, who is wearing a dandelion at national level | राष्ट्रीय पातळीवर दंडारकला जोपासणारे उद्धवराव

राष्ट्रीय पातळीवर दंडारकला जोपासणारे उद्धवराव

Next
ठळक मुद्दे आतापर्यंत साकारले साडेतीनशे पात्र : पांरपारिक कलेची जोपसना

हितेश रहांगडाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : पोटासाठी सारेच झटतात परंतु कलेसाठी जीवनातील सुख बाजूला सारुन झाडीपट्टीतील लोककला राष्टÑीय पातळीवर जिवंत ठेवणाºया उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाला सारेच सलाम करीत आहेत.
दंडार हा लोककला प्रकार ज्यांच्या रक्तातच भिनलेला आहे असे उद्धवराव टेंभरे. तिरोडा तालुक्यातील भजेपार या दुर्गम भागातील वस्तीतील रहिवासी, वडील व समाजाकडून दंडार कलेचा मिळालेला वारसा आज त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेलेला आहे. अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच दंडार या कलाप्रकारात निपुण उद्धवराव व्यवसायाने ज्ञानादानाचे कार्य करीत आहेत. परंतु शासकीय नोकरी मिळाली म्हणून शहराकडे धाव न घेता गावातच राहून ते आजही दंडारीला जपत आहेत. विक्तुबाबा दंडार मंडळाच्या नावाने दंडार कला जोपासणाºया उद्धवरावानी जिल्हा किंवा राज्य पातळीवरच नव्हे तर राष्टÑीय पातळीवरही दंडार कलेस जीवंत ठेवले आहे. वयाची साठी जवळ आली असतानाही ‘पहाडी’ आवाजाचा धनी असलेला हा कलावंत आजही तितक्याच स्फूर्तीने दंडारीसाठी झटत आहे. ‘दंडार’ या कला प्रकारातून त्यांनी अनेक विषयांवर जनजागृती केली आहे. निर्मलग्राम, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, नोटबंदी, यासारख्या ज्वलंत विषयासह पुरातन कालीन प्रथा, संस्कृती यांना जपण्यावरही त्यांचा भर आहे. उद्धवराव यांचा हार्मोनियम, कॅशिओ वादनासह अभिनय, गीतगायन, जसजागरण, भजन, लेखन सारख्या अनेक विषयावर प्रभुत्व आहे.
आजतागायत सुमारे २७६ हून अधिक भूमिका त्यांनी साकारल्या असून ११३ ठिकाणी विविध कला स्पर्धेत सहभाग घेत मंडळाला लाखोंची बक्षीसे मिळवून दिली आहेत. झाडीपट्टी पर्यटन लोककला महोत्सव व लोककला साहित्य संमेलनात त्यांना राष्टÑीय पातळीवर गौरविण्यात आले आहे. मंडई, जलसा, जागरण, भजनसंध्या, नवटंकी ड्रामा, मराठी नाटक यासह दंडार कलेवर विशेष भर देणाºया उद्धवरावांना त्यांच्या मंडळाची, कुटुंबियाची व विद्यालयाचे प्राचार्य ए.डी. पटले यांचे नेहमी सहकार्य व प्रोत्साहन मिळाले आहे. केवळ शासकीय नोकरी करुन स्वत:चे अस्तित्व मर्यादित न ठेवता ‘दंडार’ कलेसाठी आयुष्य झटणाºया या तडफदार व परिश्रमी कलावंतावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Web Title:  Uddhavra, who is wearing a dandelion at national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.