गावा-गावात युना सेनेची फळी तयार करणार()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:09+5:302021-08-25T04:34:09+5:30
गोंदिया: कोरोना संसर्ग काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात तरुण युवासेनेकडे आकर्षित आहेत. ...
गोंदिया: कोरोना संसर्ग काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात तरुण युवासेनेकडे आकर्षित आहेत. ही बाब लक्षात घेऊन ‘युवा सेना पदाधिकारी संवाद’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आगामी काळात गावागावात युवासेनेची फळी तयार होणार आहे. या माध्यमातून शिवसेना हा पक्षदेखील बळकट होणार, असा विश्वास युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
युवासेना पदाधिकारी संवाद कार्यक्रमासाठी वरूण सरदेसाई हे (दि.१९) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सहाव्या टप्प्यात पूर्व विदर्भाचा दौरा आपण करीत आहोत. नागपूर, भंडारानंतर गोंदिया जिल्ह्यात पोहोचलो. दरम्यान युवा सैनिकांमधील नवचैतन्य पाहून गोंदिया जिल्ह्यातही आगामी काळात शिवसेना हा पक्ष बळकटीने उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आघाडी धर्मातून की स्वतंत्र, या बाबीचा निर्णय पक्षप्रमुख घेणार आहेत; मात्र आजघडीला शिवसेना हा पक्ष आगामी निवडणुकांना सर्व शक्तीनिशी पुढे जाणार आहे. २०० हून अधिक तरुणांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आजघडीला गोंदिया जिल्ह्यात २०० हून अधिक तरुणांची फळी तयार झालेली आहे. आगामी काळात प्रत्येक गावागावात युवा सेनेची कार्यकारिणी उभी करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.