आईला मारल्याचा राग सहन न झालेल्या मुलाने केला खून

By नरेश रहिले | Published: November 14, 2023 05:54 PM2023-11-14T17:54:09+5:302023-11-14T17:54:55+5:30

गोंदिया : वडिलांना दारू पाजली आणि आईच्या कानशिलात हाणली मग त्याला जिवंत का ठेवायचा असा विचार करणाऱ्या मुलाने मित्रांच्या मदतीने ...

Unable to bear the anger of killing his mother, the son committed the murder | आईला मारल्याचा राग सहन न झालेल्या मुलाने केला खून

आईला मारल्याचा राग सहन न झालेल्या मुलाने केला खून

गोंदिया : वडिलांना दारू पाजली आणि आईच्या कानशिलात हाणली मग त्याला जिवंत का ठेवायचा असा विचार करणाऱ्या मुलाने मित्रांच्या मदतीने त्या तरूणाला बेदम मारहाण करून रस्त्यालगत फेकून दिले. परंतु दारूच्या भरात रात्रभर पडून असलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना १३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. रवींद्र उर्फ गुड्डू हिरामण कावरे (३०) रा. वारकरीटोला (कोटरा) असे मृताचे नाव आहे.

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वारकरीटोला कोटरा येथील मृतक रवींद्र उर्फ गुड्डू हिरामण कावरे (३०) हा कामासाठी नेहमीच बाहेरगावी जायचा. मात्र पंधरा दिवसांपासून तो गावी आला होता. दरम्यान १३ नोव्हेंबरला त्याने गावातीलच एका वयोवृद्ध व्यक्तीला दारू पाजली होती. त्याच्या पत्नीने माझ्या नवऱ्याला दारू का पाजली म्हणून रविंद्रला शिवीगाळ केली. यावेळी रागात आलेल्या रविंद्रने तिला गालावर थापड मारली. या गोष्टीचा राग ठेवून वृध्दाच्या मुलाने आपल्या काही मित्रांसोबत संध्याकाळी रवींद्रला मोटार सायकलने साखरीटोला येथे नेऊन एका बारमध्ये त्याला दारू पाजली.

गावात रस्त्यावर त्याला मारहाण केली व गावातील शेवटच्या घराच्या बाजूला फेकून दिले. तिकडे रात्रभर रवींद्र घरी पोहोचला नाही. सकाळी घराजवळील लोकांना रवींद्र पडलेल्या अवस्थेत दिसला. रवींद्रचे नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनाम करीत मृतदेह विच्छेदनासाठी सालेकसा येथे पाठविले. त्याचा पुजारीटोला धरणावर अंत्यसंस्कार करण्यात आला. रविंद्रच्या मृत्यू नेमका कशाने झाला आहे उत्तर उत्तरीय तपासणी अहवालानंतर कळेल. गावात खून झाल्याची जोरदार चर्चा आहे. या घटनेच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

Web Title: Unable to bear the anger of killing his mother, the son committed the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.