एकाच छताखाली आजारांचे निदान व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 09:35 PM2019-02-14T21:35:52+5:302019-02-14T21:36:13+5:30
शिक्षण, पाणी आणि आरोग्य या आजच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी-मोरगाव तालुका हा नक्षल, मागास, आदिवासी व दुर्गम तालुका आहे. सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सामान्य गंभीर आजाराचे निदान व उपचार व्हावे या उद्देशाने या महा आरोग्य मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जनतेला मार्गदर्शन व्हावे व गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सेवेचे महत्त्व वाढावे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : शिक्षण, पाणी आणि आरोग्य या आजच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी-मोरगाव तालुका हा नक्षल, मागास, आदिवासी व दुर्गम तालुका आहे. सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सामान्य गंभीर आजाराचे निदान व उपचार व्हावे या उद्देशाने या महा आरोग्य मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जनतेला मार्गदर्शन व्हावे व गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सेवेचे महत्त्व वाढावे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
नवेगाव येथे आयोजीत महाआरोग्य मेळाव्याच्या उद्घाटना प्रसंगी सोमवारी (दि.११) ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जि.प. सदस्य किशोर तरोणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, पं.स.सदस्य सिशुला हलमारे, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष लेखपाल गहाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोज राऊत, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप खुपसे, अर्जुनी मोरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकीनवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत, राकेश जायस्वाल उपस्थित होते.
प्रारंभी धन्वंतरी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, चर्मरोग, कान, नाक, घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार, मौखिक रोग, दंत, मानसिक विकृती, मुलांचे आजार निदान व उपचार आयुष चिकित्सा आयुर्वेद, होमियोपॅथी व युनानी चिकित्सा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या आरोग्य महामेळाव्यात रेडीओलॉजीस्ट डॉ. घनश्याम तुरकर, शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, नेत्रतज्ञ डॉ. नितीका पोयाम, जनरल सर्जन डॉ. पर्वते, डॉ. येडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनोज राऊत, हृदयरोग तज्ञ डॉ. संजय येडे, औषधशास्त्र विभागतज्ञ डॉ. अकितवार, दंतरोग तज्ञ डॉ. भांडारकर, डॉ. दिपाली कोल्हाटकर, बालरोगतज्ञ डॉ. निलेश ताफडे, त्वचारोग तज्ञ डॉ. सौरभ राऊत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. पल्लवी नाफडे, डॉ. पांडे, कुष्ठरोग तज्ञ डॉ. जगन्नाथ राऊत, मनोविक्री तज्ञ डॉ. येरणे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.अजय घोरमारे यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात हर्नीया व हायड्रोसील, गाठ व कुटुंब नियोजन अशा एकूण ४४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (केटीएस) गोंदिया येथे उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोज राऊत यांनी सांगितले. या महाआरोग्य मेळाव्याचा लाभ जिल्हा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सुमारे ४ हजार नागरिकांनी घेतला. यावेळी रुग्णांना मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी मांडले. संचालन क्षयरोग पर्यवेक्षक पवन वासनिक व अॅड. रेखा सपाटे यांनी केले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी मानले. मेळाव्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. यादव, डॉ. महेश लोथे, डॉ. बाळू कापगते, हेमतराम रिनाईत, हेमराज रंगारी, शिशुपाल ढोके, बडके, कापगते, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
रक्तदात्यांच्या सत्कार व प्रमाणपत्र वितरण
शिबिरात सिकलसेलग्रस्त १२ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच रक्तदान शबिरात रक्तदान करणाºया रक्तदात्यांनाही प्रमाणपत्र देऊन पाहु्ण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध आजारासंबंधी माहिती देणारी आरोग्य प्रदर्शनी भरविण्यात आली होती. खासदार कुकडे यांच्यासह पाहु्ण्यांनी प्रदर्शनीला भेट देवून माहिती जाणून घेतली.