गोंदियातील विद्युत लाईन भूमिगत करा

By admin | Published: August 18, 2015 01:58 AM2015-08-18T01:58:37+5:302015-08-18T01:58:37+5:30

गोंदिया शहरात भूमिगत विद्युत लाईन तयार करण्यासह वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी

Underground the Gondia electric line | गोंदियातील विद्युत लाईन भूमिगत करा

गोंदियातील विद्युत लाईन भूमिगत करा

Next

गोंदिया : गोंदिया शहरात भूमिगत विद्युत लाईन तयार करण्यासह वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंगळवारी (ता.१८) भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करणार आहेत.
गोंदिया शहरातील विद्युत लाईन जुनी झाली असून वारंवार दुरूस्ती करण्याची वेळ येत आहे. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. वीज पुरवठ्याची मागणी वाढत चालली आहे. शहराच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर विद्युत लाईनकरिता लावलेले खांब वाहतुकीला अडथळा ठरतात. याकरिता शहराला आधुनिकतेच्या दृष्टीकोनातून भूमिगत विद्युत लाईन करणे गरजेचे झाले आहे. भाजपकडून याबाबत पूर्वीही मागणी लावून धरण्यात आली आहे.
उर्जामंत्री बावनकुळे मंगळवारी (दि.१८) गोंदियाच्या दौऱ्यावर असताना भाजपचे शिष्टमंडळ त्यांना याबाबत आग्रही मागणी करणार आहे. तसेच कृषीपंपाच्या रखडलेल्या विद्युत कनेक्शन वाटप करण्याबाबत, फॉल्टी मीटर व फॉल्टी बीलामधून ग्राहकांची होणारी लुट थांबवून मीटर दुरूस्त करण्याबाबत, तांत्रिक कारणामुळे अघोषित विद्युत पुरवठा खंडीत न करण्याबाबत, विद्युत लोड कमी करण्याकरिता सबस्टेशनची संख्या वाढविण्याबाबत, भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

उर्जामंत्री बावनकुळे
आज गोंदियात
४राज्याचे उर्जा व नविनीकरण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे १८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी १० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे पोहोचतील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण व महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी २ वाजता गोंदिया तालुक्यातील हिवरा येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन करतील आणि दुपारी ३ वाजता मोटारीने भंडाऱ्याकड प्रयाण करतील.

Web Title: Underground the Gondia electric line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.