भुमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न ट्रॅकवर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:11+5:302021-01-21T04:27:11+5:30

() गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील भूमिगत वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. हा प्रश्न खा. प्रफुल्ल पटेल ...

Underground power line on track () | भुमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न ट्रॅकवर ()

भुमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न ट्रॅकवर ()

Next

()

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील भूमिगत वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. हा प्रश्न खा. प्रफुल्ल पटेल यांनी गांभीर्याने घेतला. यानंतर त्यांच्याच आग्रहावरुन बुधवारी (दि.२०) मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे भूमिगत गटार योजनेचा प्रश्न ट्रॅकवर आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आयोजित बैठकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील वीज संबंधित प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. त्यामुळे आता गोंदिया व भंडारा या दोन्ही नगरातील भूमिगत वाहिनी टाकण्याचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या आढावा घेतला. गोंदिया-भंडारा येथील भूमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसांपासून निधीअभावी प्रलंबित आहे. दोन्ही जिल्ह्यातील विद्युत वाहिन्याचे नविनीकरणाचे काम प्रलबिंत आहे या विषयांवर सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना २४ तास वीज तसेच कृषीपंपाचे कनेक्शन आदी बाबींवर माहिती घेण्यात आली. दरम्यान सर्व प्रलंबित प्रश्न व प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यात यावे, असे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले. दोन्ही जिल्ह्यातील वीजसंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागाला आश्वासित केले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,नियोजन विभागाचे अप्पर सचिव देवाशीष चक्रवती, वित्त विभागाचे अप्पर सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, व्यवस्थापकीय संचालक महावितरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

.......

प्रलबिंत विद्युत उपकेंद्रे मार्गी लागणार

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नवीन विद्युत उपकेंद्राचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलबिंत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. तर वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत होता. आता विद्युत उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ही समस्या सुध्दा दूर होणार आहे.

.....

शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त

शहरातील रस्त्यांलगत तर काही ठिकाणी विद्युत खांब लागले आहेत. त्यामुळे बरेचदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शिवाय यामुळे अतिक्रमणाच्या समस्येत वाढ झाली होती. मात्र आता भूमिगत विद्युत वाहिनी टाकली जाणार असल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे.

......

पहिल्या टप्प्यात १४२ कोटी रुपये

भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १४२ कोटी रुपये व भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात १८० काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हा दोन्ही जिल्ह्यातील

कामांना गती मिळणार आहे.

Web Title: Underground power line on track ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.