कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:19+5:302021-03-23T04:31:19+5:30

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो ...

Undo workers plan | कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

Next

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरूण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षावरून ३५ वर्ष करण्यात यावी अशी मागणी बेरोजगार तरूणांनी केली आहे.

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पाहणी करुन पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.

शेंडा परिसरात

नेटवर्कची समस्या

सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी, सिंदिपार, सलाईटोला, या गावात टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

वातावरणातील बदल आजारांमध्ये वाढ

सालेकसा : मागील तीन चार दिवसांपासून वातावरण बदल होत असल्याने विविध आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

शासन मंजूर करणार रेशन व केरोसीन परवाने

गोंदिया : ग्रामीण भागात रेशन दुकाने व केरोसीनचे परवाने देण्यासाठी संबंधित गावातील ग्रामसभेचा ठराव आवश्यक होता. मात्र, आता ग्रामसभांच्या ठरावाशिवाय शासन परवाने मंजूर करणार आहे.

नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर

गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र पुरेशा नाल्या खोदल्या नाही. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहते.

एटीएममध्ये सुविधांचा अभाव

गोंदिया : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी वॉचमन कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे.

शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे

केशोरी : अलीकडे वीज वितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीज बिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्र बसविण्याकडे वळत आहे.

Web Title: Undo workers plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.