कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:55+5:302021-07-12T04:18:55+5:30

गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्चला पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते ...

Undo workers plan | कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

Next

गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात

परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्चला पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे; पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विविध आकार व कर कमी करावेत

नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा करआकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून महावितरणने वीजग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.

रेतीसाठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेतीघाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे, तसेच अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडलेला असतो. रेतीमाफिया घाटांतून आणलेली रेती शहरातील वेगवेगळ्या भागांत टाकून देत आहेत.

रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ

सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत आहे. शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे.

दुग्ध व्यवसाय डबघाईस

अर्जुनी-मोरगाव : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे.

सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था

तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यांपैकी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

बोंडगावदेवी : शासनाने तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना बक्षीसरूपात रक्कम दिली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर या समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तंटामुक्त मोहीम नावापुरतीच दिसत आहे.

शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे

केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीज बिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.

नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर

गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाली खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाली खोदल्या, तेथील नालीही नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत.

महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा

गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.

ग्रामीण भागात माकडांचा उच्छाद

पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येऊन घराचे व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

सालेकसा : अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजप्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपींमधून होत आहे. त्यामुळे मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Undo workers plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.