यंत्रांच्या आगमनाने मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Published: May 7, 2017 12:23 AM2017-05-07T00:23:43+5:302017-05-07T00:23:43+5:30

सध्याच्या संगणकीय युगात अत्याधुनिक यंत्र उपलब्ध होऊ लागले आहेत. शेतकाम, खोदकाम व शासकीय कामे आता यंत्रामार्फत केली जातात.

Unemployed Kurhad on the arrival of machinery by the workers | यंत्रांच्या आगमनाने मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

यंत्रांच्या आगमनाने मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Next

युग संगणकाचे : सर्वच कामात मशीनचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्याच्या संगणकीय युगात अत्याधुनिक यंत्र उपलब्ध होऊ लागले आहेत. शेतकाम, खोदकाम व शासकीय कामे आता यंत्रामार्फत केली जातात. त्यामुळे मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
संगणकाने देशात प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ विविध यंत्रणा कामाला लागल्या. शासकीय कामातही मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर होवू लागला. रोजगार हमी योजना यासारख्या कामातही शासन यंत्रांचा वापर करीत आहे. कुठल्याही शहरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम असो किंवा शासन स्तरावरील खोदकाम असो, यंत्रांद्वारे अगदी अल्प वेळात ते उरकवून घेतले जाते. पूर्वी ज्या ठिकाणी शेकडो मजूर कामाला जात होते, त्या ठिकाणी आता अत्यल्प मजुरांकडून कामे करवून घेण्याचा प्रकार सुरू आहे. ही सर्व कामे यंत्रांद्वारे केली जात आहेत. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि यंत्रांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
शासकीय कंत्राटदार लाखो रूपये खर्च करून यंत्रांची खरेदी करीत आहेत. सिमेंट काँक्रीटचे काम करण्यासाठीसुद्धा आता यंत्र उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सिमेंट, रेती व गिट्टी यांना एकत्रित करून बांधकामही लवकरात लवकर केले जात आहे. शेती कामातही ट्रॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेसर यासारख्या यंत्रांचा उपयोग केला जात आहे. शेतीची मशागत, नागरणी, वखरणी व मळणी यासारखी शेतीसाठी उपयोगी अवजारे आता नेस्तनाबूत झाल्याने अवजारे तयार करणाऱ्या सुतारांच्या व्यवसायांवर उतरती कळा लागली आहे.

Web Title: Unemployed Kurhad on the arrival of machinery by the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.