निसर्गसंपन्न गोंदियात ‘हॉर्स शू’ या अनोख्या वटवाघळाची नोंद; झेडएसआयची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:32 AM2019-10-30T01:32:58+5:302019-10-30T01:33:03+5:30

बीएनएचएसच्या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित

An Unique Weapon Tragedy of the Horse Shoe in Nature Gondiat; Approval of ZSI | निसर्गसंपन्न गोंदियात ‘हॉर्स शू’ या अनोख्या वटवाघळाची नोंद; झेडएसआयची मान्यता

निसर्गसंपन्न गोंदियात ‘हॉर्स शू’ या अनोख्या वटवाघळाची नोंद; झेडएसआयची मान्यता

Next

गोंदिया : निसर्ग संपन्न गोंदिया जिल्ह्यात हॉर्स शू नामक वेगळ्या प्रजातीच्या अनोख्या वटवाघळाची नोंद नवेगावबांध जवळील प्रतापगडच्या पहाडात केली आहे. विशेष म्हणज, झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (झेडएसआय) यांनी वटवाघळाच्या ओळखीवर शिक्कामोर्तब केले आहे. या वटवाघळासंदर्भात लिहिलेला शोधनिबंध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

प्रा. डॉ.गोपाल पालीवाल, प्रा.डॉ.सुधीर भांडारकर, झेडएसआयचे वैज्ञानिक डॉ. श्याम तलमले, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, निसर्ग अभ्यासक अंकुर काळी या चमूने ही नवी नोंद केली आहे. त्यांनी हॉर्स शू वटवाघळाला नवेगाव राष्ट्रीय उद्यानानजिकच्या प्रतापगड पहाडावर पाहिले.

घोड्याच्या पायाला लावण्यात येणाऱ्या नालेला इंग्रजीत हॉर्स शू म्हणतात. त्यामुळे मराठीत या प्रजातीला ‘नाल वटवाघूळ’ म्हणता येईल.
अशी पटली ओळख प्रतापगड गाव येथील पहाडावरच्या गुफेत हॉर्स शू प्रजातीचे वटवाघूळ या चमूला मृतावस्थेत आढळले. त्याची निश्चित ओळख होण्यासाठी मृत शरीराचे नमूने झेड.एस.आय. च्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात पाठविण्यात आले तेथे संशोधन करून मग तो नमुना मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आला. तिथे त्याला योग्यप्रकारे संरक्षित केल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली.

पूर्व विदर्भात प्रथमच नोंद
नाल वटवाघळ या इवल्याशा सस्तन प्राण्याची ही प्रजाती दक्षिण आशियासह भारतीय उपखंडात काही ठिकाणी आढळते. दिवसेंदिवस वटवाघळांच्या अनेक प्रजातींची संख्या कमी होत असून त्या दुर्मीळ होत आहेत. त्यामुळे त्यांचे वैविध्य तपासण्यासाठी प्रतापगड पहाडाच्या किल्ला परिसरातील गुंफांचा शोध या चमूने घेतला.

Web Title: An Unique Weapon Tragedy of the Horse Shoe in Nature Gondiat; Approval of ZSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.