युनिट कमी मात्र बिल अधिक
By admin | Published: May 28, 2017 12:14 AM2017-05-28T00:14:12+5:302017-05-28T00:14:12+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नेहमी भोंगळ कारभारामुळे चर्चेत असतो. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका
ग्राहक झाले त्रस्त : विद्युत विभागाचा भोंगळ कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नेहमी भोंगळ कारभारामुळे चर्चेत असतो. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका येथील ग्राहकांना बसतो. नेहमीच येथील ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. युनिट कमी मात्र बील रक्कम अधिक असल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे.
सालेकसा तालुक्याच्या मक्काटोला येथील धनलाल गोमा भांडारकर यांना युनिटच्या मानाने देय रक्कम अधिक पाठविण्यात आली. देयक २० मे २०१७ नुसार मागील रिडींग १८२० व चालू रिडींग १८२० असून सुध्दा वीजेचा वापर (युनिट) शंभर दाखवून देयक रक्कम ४५० रुपये पाठविण्यात आली आहे. जेव्हा रिडींग सारखीच आहे तर मग विद्युत विभागाने शंभर युनिट काढून दाखविले असा प्रश्न सदर ग्राहकाला पडला आहे. मागील देयक दिनांक १३ एप्रिल २०१७ नुसार चालू रिडींग १८२० व मागील रिडींग १८१२ होती यात केवळ ८ युनिटचा फरक होता मात्र बील ११० रु. पाठविण्यात आला. या प्रकारामुळे ग्राहकांना विनाकारण अधिकचे पैसे मोजावे लागतात. ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा माणस विद्युत वितरण कंपनीचा दिसून येते. हा प्रकार मागील अनेक दिवसापासून होत आहे. अनेक ग्राहकांकडून अश्या तक्रारी येत आहेत. जे ग्राहक आलेल्या बिलाकडे लक्ष न देता सरसकट पैसे भरतात त्यांची चांगलीच लुबाडणूक होत आहे. विद्युत विभागाचा कारभार कधी सुधारणार असा प्रश्न होत आहे.
विजेचा लपंडाव
सालेकसा तालुक्यात विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे. तालुका नक्षलग्रस्त असतांनाही केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाही विद्युत पूरवठा खंडीत केला जातो. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. विद्युत विभागाला काहीही देखे घेणे नाही.