विनापरवाना विटांचे कारखाने जोमात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 01:37 AM2017-03-29T01:37:36+5:302017-03-29T01:37:36+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विटा तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू आहे.

Unpaid Bricks Factory Start | विनापरवाना विटांचे कारखाने जोमात सुरू

विनापरवाना विटांचे कारखाने जोमात सुरू

Next

बुडतोय महसूल : अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालताहेत व्यवसाय
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विटा तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू आहे. मात्र आता नव्याने विटा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रत्येक व्यवसायिक शॉर्टकट मार्गाने कमी वेळेत विनापरवाना अवैध विटा व्यवसायाला चालना देत आहेत. त्यामुळे वातावरणात बराच बदल होत आहे.
वीट भट्टीसाठी लागणारा कोंडा, वाळू, भसवा, माती यासाठी पर्यावरण खात्याचा परवाना लागतो. मात्र नियम धाब्यावर ठेवून ग्रामीण भागात वीट व्यवसायाला उधान आले आहे. विटा व्यवसायाला लागणाऱ्या मातीला रॉयल्टी लागते. विटा तयार भसवा (बारीक वाळू) चा समावेश असतो. त्यालाही रॉयल्टी लागते. विना परवाना (रॉयल्टी) नसूनही विटा तयार करणाऱ्यांचा कार्यक्रम जोमात सुरू आहे.
सौंदड परिसरामध्ये वीट व्यवसाय चांगलाच जोमात आहे. विना परवाना अवैधरित्या दिवसेंदिवस होत असलेल्या कामांकडे शासन तातडीने लक्ष देणार का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. देशाच्या उन्नतीमध्ये लागणार पैसा हा महसूल विभागाकडून वसूल करून देश विकास केला जातो. मात्र काही कर्मचारी अवैध व्यावसायीकांकडे जावून दंडात्मक कारवाई न करता दंडाची अर्धी रक्कम घेऊन परतत आहेत.
अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध विटाभट्टीचे काम जोमात सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याकरीता पथक तयार करून त्यांची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Unpaid Bricks Factory Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.