अवकाळी पावसाचा भात पिकाला मोठा फटका; पंचनामे करून अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 11:21 AM2023-12-13T11:21:48+5:302023-12-13T11:22:12+5:30

अवकाळी पावसाने या धान पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Unseasonal rains hit rice crop hard; Report submitted by Panchnama | अवकाळी पावसाचा भात पिकाला मोठा फटका; पंचनामे करून अहवाल सादर

अवकाळी पावसाचा भात पिकाला मोठा फटका; पंचनामे करून अहवाल सादर

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या भात पिकाला सर्वात जास्त हानी पोहोचली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पुंजणे आणि धान कापून ठेवले होते. मात्र, अवकाळी पावसाने या धान पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याविषयी पंचनामे कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामसेवक यांच्या द्वारा करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यामधील जवळपास 22 हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. याविषयी अहवाल तयार करून शासन स्तरावर आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसारचं शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी रक्कम आणि शासन भरपाई देणार असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले आहे.

Web Title: Unseasonal rains hit rice crop hard; Report submitted by Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.