शिक्षक बदलीस स्थगिती केव्हापर्यंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 12:15 AM2016-06-24T00:15:30+5:302016-06-24T00:15:30+5:30

पाच वर्षांनंतर जि.प. गोंदिया येथे प्रशासकीय व विनंती बदली करण्यात आली. मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली ...

Until the teacher's suspension? | शिक्षक बदलीस स्थगिती केव्हापर्यंत?

शिक्षक बदलीस स्थगिती केव्हापर्यंत?

Next

चौकशी कधी व केव्हा : जिल्हा परिषद प्रशासन बघ्याच्या भूमिकेत
करटी : पाच वर्षांनंतर जि.प. गोंदिया येथे प्रशासकीय व विनंती बदली करण्यात आली. मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली थांबविण्यासाठी बदलीवर स्थगिती मिळविली. आता ही स्थगिती कधीपर्यंत राहील व चौकशी कधी होईल, अशी समस्या बदली हवी असलेल्या शिक्षकांपुढे उभी ठाकली आहे.
३ जून रोजी करण्यात आलेल्या बदलीमागे चांगला हेतू होता. त्यामुळे दुर्गम भागातील कार्यरत शिक्षक मुख्य प्रवाहात येणार, २० ते २५ वर्षांपासून जे शिक्षक शहराजवळील शाळेत कार्यरत आहेत ते दुर्गम भागात जातील व काही शाळेतील रिक्त पदे भरल्या जातील. तसेच ५२ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक आपल्या सोयीच्या शाळेत नियमानुसार जाणार, लहान शाळेतील शिक्षक मोठ्या शाळेत जाणार तर मोठ्या शाळेतील शिक्षक लहान शाळेत जाणार होते.
मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली थांबविण्यासाठी बदलीवर स्थगिती मिळविली. पण बदलीची चौकशी केव्हा होणार? हे गुलदस्त्यात आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बदली करणे प्रशासनास अवघड जाईलच व या सर्वात चघडल्या जाईल ते शिक्षकच. या अन्यायग्रस्त शिक्षकांची बाजू कोणीतरी ऐकणार काय? असा सवाल त्यांनी केला आहे. बदली झाल्यामुळे काही शिक्षकांनी आपले मुख्यालय स्थलांतरित केलेले आहेत. पण आजपर्यंत बदलीबाबत कोणतेच निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षक चातकाप्रमाणे बदली आदेश केव्हा मिळेल याची वाट पाहत आहेत.

Web Title: Until the teacher's suspension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.