अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका, रसाचे आंबे ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:47+5:302021-05-13T04:29:47+5:30

............. जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातील फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, ...

Untimely rains hit mango growers, juice mangoes cost Rs 60 per kg | अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका, रसाचे आंबे ६० रुपये किलो

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका, रसाचे आंबे ६० रुपये किलो

googlenewsNext

.............

जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातील फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, एमआरजीएसअंतर्गत फळबाग लागवडीची कृषी विभागाची योजना आहे. याचा लाभ आता शेतकरी घेऊ लागले आहेत.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

......

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी लदबदली होती. मात्र दोन दिवसापूर्वीच झालेल्या वादळी वाऱ्याने अडीच एकरातील आंबे जमीनदोस्त होत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने अशा संकटसमयी तातडीने मदत करण्याची गरज आहे.

- निहारीलाल दमाहे, आंबा उत्पादक शेतकरी, लोधीटोला

..............

पूर्वीसारखी आता मोठमोठी आंब्याची झाडे राहिली नाही. मात्र तरीदेखील आजही गावात काही झाडे शिल्लक आहेत. मी दरवर्षी आवडीने गावरान आंबा गोंदियावरून खरेदी करतो. मात्र यावर्षी आंब्यासाठी घराबाहेर पडत नाही. कोरोनाचे संकट असल्याने खरेदी केली नाही.

- मेघश्याम नागपुरे, ग्राहक,

..............

अनेक ग्राहकांकडून केशर, दशेरी, लंगडा व लोकल आंब्याला मागणी आहे. मात्र संचारबंदीमुळे व कोरोनामुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. नगर परिषदेने आम्हाला थोडी शिथिलता द्यायला हवी. सकाळी १० वाजतापासूनच ग्राहक यायला सुरुवात होते.

- लारेन्स कावळे, फळ विक्रेता, गोंदिया

..........

अवकाळी पावसाने गावठी आंब्याचे नुकसान

जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. त्यातच आंब्याचे उत्पन्नही अनेक जण घेतात. मात्र आठवडाभरापासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने आंबा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत देण्याची गरज आहे. जिल्ह्यात काही मोजकेच ग्राहक हापूस आंब्याची मागणी करतात. विक्रेत्यांनी घरपोहोच डिलिव्हरीची सोयही उपलब्ध केली आहे. मात्र विशेषकरून रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे दर अद्यापही ९०० ते १००० रुपये डझनच्या आसपास आहेत.

..........

Web Title: Untimely rains hit mango growers, juice mangoes cost Rs 60 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.