औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:41+5:302021-05-01T04:27:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यासाठी औद्यागिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठीच्या वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व ...

Unveiling of web portal for creation of industrial production index | औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : राज्यासाठी औद्यागिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठीच्या वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, इंडस्ट्री असोसिएटचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ-उताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून, देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. हा निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील, राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनाला अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगताला, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील निवडलेल्या ५६८ कारखान्यांकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेबपोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या माहितीवर संस्करण करुन राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

Web Title: Unveiling of web portal for creation of industrial production index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.