युरियामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:28+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकºयांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने कृषी विभागाने यंदा १४ हजार ४०५ युरियाची मागणी केली होती. यापैकी आतापर्यंत ११ हजार १४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे.

Urea perpetuates farmers' woes | युरियामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम

युरियामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम

Next
ठळक मुद्देकृषी विभाग म्हणतो, चार दिवसात येणार युरिया : विक्रेते म्हणतात, दोन दिवसातच संपला साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वीच १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक आली होती.यानंतर या युरियाचा जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना पुरवठा सुध्दा करण्यात आला. मात्र हा साठा दोन दिवसातच संपल्याने जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकºयांची होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकºयांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने कृषी विभागाने यंदा १४ हजार ४०५ युरियाची मागणी केली होती. यापैकी आतापर्यंत ११ हजार १४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे.
मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मेट्रीक टन युरियाचा कमी पुरवठा झाल्याने सध्या बाजारपेठेत युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात युरिया खत मिळत नसल्याची ओरड वाढल्यानंतर खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली येथील खत कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन खताचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर १५ जुलैला १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली होती. त्यानंतर या खताचा संपूर्ण जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आल्याचा दावा वितरक करीत आहे. मात्र जेवढा युरिया आला त्यापैकी बराच युरिया अद्यापही काही वितरकांनी गोदामात साठवून ठेवल्याची ओरड चिल्लर विक्रेत्यांमध्ये आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वीच गोंदिया-गोरेगाव मार्गावरील तुमखेडा येथील गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळला होता.
जर जिल्ह्यातील छोट्या विक्रेत्यांना युरियाचा पुरवठा करण्यात आला तर गोदामात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील मोठे विक्रेते जरी युरियाचा सर्व चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा झाल्याचा दावा करित असले तरी युरियाच्या पुरवठ्या मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याची वरिष्ठांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

दीड लाख हेक्टरमधील रोवणी शिल्लक
यंदा पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ ४५ हजार हेक्टरमधील रोवणी आटोपली आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरमधील रोवणी शिल्लक आहे. त्यातच युरिया मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड वाढली आहे. केवळ २५ टक्के रोवणी झाली असताना ही स्थिती असल्याने ७५ टक्के रोवणी शिल्लक आहे. त्यामुळे युरियासाठी शेतकºयांची अधिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

२६६ रुपयांचा युरिया ३५० रुपयांना
जिल्ह्यात युरियाच्या निर्माण झालेल्या टंचाईचा काही विक्रेते फायदा उठवित आहे. युरियाच्या प्रती चुंगडीची किमत २६६ रुपये ५० पैसे आहे.मात्र काही विक्रेते ३५० रुपये प्रती चुंगडी दराने युरियाची विक्री करित असल्याची शेतकºयांची ओरड सुरू आहे. शेतकºयांना प्रति बॅग १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे.

पुरवठा झाला तर टंचाई कशी
कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी एकूण १४ हजार ४०५ मेट्रीक टन युरियाची मागणी केली आहे. यापैकी ११ हजार १४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. मात्र यानंतरही शेतकºयांना युरिया मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वितरकांना पुरवठा करण्यात आलेला युरिया नेमका गेला कुठे हा संशोधनाचा विषय आहे. कृषी विभागाने काही वितरकांच्या गोदामावर छापे मारल्यास युरियाच्या टंचाईचे गौडबंगाल पुढे येईल अशी चर्चा सुध्दा सुरू आहे.

तीन हजार मेट्रीक टन युरिया येणार
यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता २३ जुलैपर्यंत युरिया खताच्या चार रॅक लागणार आहे. जवळपास तीन हजार मेट्रीक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे.त्यामुळे युरियाची टंचाई दूर होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Urea perpetuates farmers' woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.