युरिया खतावर लिकिंग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:52 PM2019-07-04T20:52:38+5:302019-07-04T20:52:53+5:30

केंद्रीय कृषी मंत्रालयाने खतावर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिकींग करण्याचा प्रकार बंद करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या. मात्र यानंतरही लिकींगचा प्रकार सुरूच आहे.आरसीएफ कंपनीने १२ टन युरियावर ५ टन सुफला खताची सक्ती विक्रेत्यांवर केली जात आहे.

Urea starts leaking on fertilizer | युरिया खतावर लिकिंग सुरूच

युरिया खतावर लिकिंग सुरूच

Next
ठळक मुद्दे६२ हजाराच्या युरियावर १ लाखाच्या इतर खताची सक्ती : कृषी विभाग व प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्रीय कृषी मंत्रालयाने खतावर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिकींग करण्याचा प्रकार बंद करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या. मात्र यानंतरही लिकींगचा प्रकार सुरूच आहे.आरसीएफ कंपनीने १२ टन युरियावर ५ टन सुफला खताची सक्ती विक्रेत्यांवर केली जात आहे.१२ टन युरिया खताची किंमत ही ६२ हजार रुपये असून त्यावर दिल्या जाणाऱ्या लिकींग खताची किमत १ लाख रुपये होते. त्यामुळे ६२ हजार रुपयाच्या युरिया खतावर इतर १ लाख रुपयांचे खत खरेदी करायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून या दरम्यान युरिया खताची मोठी मागणी असते. त्यामुळे कंपन्या सुध्दा हिच संधी साधत युरिया खतासोबत इतर खते घेण्याची सक्ती करीत आहे.त्यामुळे याचा भूर्दंड विक्रेते आणि शेतकऱ्यांना बसत आहे. दोन तीन दिवसांपूर्वी गोंदिया येथे आरसीएफ कंपनीची युरिया खताची रॅक लागली. मात्र सदर रॅक लागल्यानंतर ज्या विक्रेत्यांनी युरिया खताची मागणी नोंदविली त्यांना १२ टन युरिया खतासह ५ टन सुफला १५,१५,१५ हे खत लिकींग स्वरुपात घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांना सुध्दा त्या भुर्दंड बसत आहे. १२ टन युरिया खताची किमत ही ६२ हजार रुपये होते आणि त्यावर लिकिंग स्वरुपात दिल्या जाणाऱ्या ५ टन सुफला खताची किमत ही १ लाख रुपये होते. त्यामुळे जेवढी किमत ही युरिया खताची होत नाही त्यापेक्षा अधिक किमत ही लिकींग स्वरुपात दिल्या जाणाऱ्या खताची होत आहे. शिवाय शेतकºयांची मागणी ही युरियाला अधिक आहे. सुफला खत घेण्यास शेतकरी सहजासहजी तयार होत नाही. तर विक्रेत्यांना कंपनीकडून सक्ती केली जात असल्याने याचा भूर्दंड शेतकºयांना बसत आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर खताच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे आणि लिकींगचा प्रकार बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र यानंतरही कंपन्याकडून लिकींग सुरूच असून युरियाची अतिरिक्त दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे मोदी सरकारची घोषणा फोल ठरल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाची डोळेझाक
कोणत्याही खत विक्री कंपन्याना खतावर लिकींग करता येत नाही.असा प्रकार घडत असल्यास कृषी आणि संबंधित विभागाला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यात खताच्या लिकींगचा प्रकार कृषी विभागाच्या डोळ्यादेखत लिकींगचा प्रकार सुरु असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
आरसीएफ कंपनीकडून युरिया खतावर केल्या जात असलेल्या लिकींगच्या प्रकाराबाबत जिल्ह्यातील काही खत विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच जेव्हा गोंदिया येथे खताची रॅक लागते तेव्हा कृषी विभागाचे आठ ते दहा कर्मचारी तिथे ठेवून खताचे वितरण करण्याची मागणी केली आहे. लिकींगची सक्ती करणाºया कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी लेखी तक्रारीतून केली आहे.

Web Title: Urea starts leaking on fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.