५३ लाख युनिट्सने वापर वाढला

By admin | Published: April 11, 2015 01:48 AM2015-04-11T01:48:21+5:302015-04-11T01:48:21+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत

Use of 53 million units increased | ५३ लाख युनिट्सने वापर वाढला

५३ लाख युनिट्सने वापर वाढला

Next

एसी-कुलर सुरू : देवरी विभागात होतो सर्वाधिक विजेचा वापर
कपिल केकत ल्ल गोंदिया

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत उपकरणांचा वापर वाढत चालल्याचा हा परिणाम आहे. उन्हाळ््यात एसी, कुलर व पंख्यांचा वापर जास्त होत असल्याने वीजेच्या वापरात भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नोंद करण्यात आलेल्या वीज वापराच्या या वाढीत देवरी विभागात ३७ लक्ष युनिट्सची वाढ दिसून येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या दुनियेत मानवाला गरज पडेल त्या वस्तूची निर्मिती केली जात आहे. यात विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. थंडीत उष्णता निर्माण करण्यासाठी बुलोवर तर उन्हाळ््यात गारवा निर्माण करण्यासाठी एयर कंडीशनर, कुलर व पंखे आदी विद्युत उपकरण उलपब्ध आहेत. एवढेच नाही तर स्वयंपाकात पोळ््या बनविण्यापासून तर विजेवर चालणारी वाहनेही आता बाजारात उपलब्ध आहेत. यंत्र व उपकरणांच्या माध्यमातून मानवाला सुखसुविधा मिळत असतानाच त्यांची अजून मागणी वाढतच चालली आहे.
आजघडीला माणसाला दररोजच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणांमधील सर्वाधिक उपकरणे विजेवर चालणारी आहेत. यामुळेच विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिनही ऋतूंत विजेचा वापर काही केल्या कमी होत नसल्याचे बघावयास मिळते.
याबाबत वीज वितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात ४१४.७८ लक्ष युनिट्स विजेचा जिल्ह्यात वापर करण्यात आला होता. तर यंदा त्यात भर पडली असून हा आकडा ४६७.७६ लक्ष युनिट्सवर गेला आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत विजेच्या वापरात जिल्ह्यात ५३ लक्ष युनिट्सची भर पडली आहे.
जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा कारभार गोंदिया व देवरी या दोन विभागांतून चालतो. त्यामुळे वीज वापराच्या आकडेवारीबाबत विभाग निहाय जाणून घेतले असता गोंदिया विभागात मागील वर्षी म्हणजेच मार्च १३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात २६१.७१ लक्ष युनिट्सची नोंद आहे. यावर्षी त्यात वाढ झाली असून हा आकडा २७७.७८ लक्ष युनिट्सवर पोहचला आहे. म्हणजेच गोंदिया विभागात १६.०७ ल.यु.विजेचा वापर वाढला आहे. देवरी विभागात मागील वर्षी १५३.०७ ल.यु. वीज वापर करण्यात आला होता. यंदा मात्र १८९.९८ ल.यु.वीज वापराची नोंद असून ३६.९१ ल.यु.वीज वापर वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. गोंदियाच्या शहरी भागात मागील वर्षी ६०.३४ ल.यु.वीज वापर करण्यात आला होता. यंदा ६४.०९ ल.यु. वीज वापराची नोंद महावितरणने घेतली आहे.

भारनियमन झालेच नाही
उत्पादनापेक्षा जास्त वीजेची मागणी असल्यास अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीला भारनियमन करावे लागते. त्यातही आता ज्या परिसरात वीज चोरीचे प्रमाण जास्त व कंपनीला मिळणारे उत्पन्न कमी आहे त्या परिसरातच भारनियमन करावे, असे निकष कंपनीने ठरविले आहे. यासाठी कंपनीने ए, बी, सी, डी, ई, एफ व जी असे गट मांडले आहेत. निकषानुसार ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमनाचा कालावधी ठरविण्यात आला असून लोड मॅनेजमेंट सेल (मुंबई) यांच्या निर्देशावरून भारनियमन केले जाते. यंदा उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत भारनियमन करण्यात आले नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
‘जी’ गटात सर्वाधिक भारनियमन
वीज वितरण कंपनीने भारनियमनासाठी तयार केलेल्या विविध गटांसाठी भारनियमनाचा कालावधी ठरविलेला आहे. यातील ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमन करावयाचे असून या गटातही आणखी तीन उपगट करण्यात आले आहेत. त्यांना जी-१, जी-२ व जी-३ म्हणून संबोधले जाते. या उपगटांत जिल्ह्यातील रतनारा, सोनेगाव (परसवाडा) हिरडामाली व मुंडीपार (गोरेगाव) या क्षेत्रांचा समावेश आहे. मात्र लोड मॅनेजमेंट सेलकडून अद्याप तरी या गटात भारनियमनाचे निर्देश देण्यात आले नसल्याने या गटाला भारनियमनापासून तूर्त दिलासा मिळाला आहे.

Web Title: Use of 53 million units increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.