रस्ता बांधकामात मातीमिश्रित गिट्टीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:28 AM2018-05-23T00:28:37+5:302018-05-23T00:28:37+5:30
सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बिजेपार : सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचीे चौकशी करण्याची मागणी आहे.
बिजेपार-कालीसरार-पुजारीटोला या धरणाकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे त्या रस्त्याची दुरुस्तीची मागणी आ. संजय पुराम यांचेकडे करण्यात आली होतीे. त्यानंतर या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. गोरेगाव येथील कंत्राटदारामार्फत सदर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्ता बांधकामात कंत्राटदार माती मिश्रीेत गिट्टीचा वापर केला जात आहे.
त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. याची तक्रार परिसरातील नागरिकांनी सालेकसा पंचायत समितीचे उपसभापती दिलीप वाघमारे, जि.प.महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्याकडे केली आहे.
त्यानंतर वाघमारे यांनी संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याशीे संपर्क साधून त्यांना या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास वाघमारे यांनी सांगितले.