नाली बांधकामामध्ये यंत्राचा वापर
By admin | Published: November 23, 2015 01:42 AM2015-11-23T01:42:12+5:302015-11-23T01:42:12+5:30
गोंगले येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय गोंदियामार्फत दलित वस्ती बांधकामाकरिता सिमेंट-क्रॉक्रेटची नाली तीन लाख रुपयांतून बांधण्यात आली.
पांढरी : गोंगले येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय गोंदियामार्फत दलित वस्ती बांधकामाकरिता सिमेंट-क्रॉक्रेटची नाली तीन लाख रुपयांतून बांधण्यात आली. या नालीच्या बांधकामासाठी कंत्राटदारांने गावातील मजूरांचा वापर न करता यंत्राच्या माध्यामातून नालीचे बांधकाम करण्यात आले.
नाली खोदकाम करताना यंत्राचा वापर केल्यामुळे ग्रामवासियांनी या कामाला विरोध दर्शविला होता. त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे येथील कंत्राटदाराने नालीचे बांधकाम केले. बांधकाम झाल्यानंतर कंत्राटदाराने अल्प प्रमाणात पाणी टाकले, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा नालीबांधकाम कच्चे झाले आहे.
यापूर्वी याच कंत्राटदाराने नालीचे बांधकाम केले असताना पावसाळ्यामध्ये नालीचे बांधकाम कोसळून पडले. परंतु अजूनपर्यंत नालीची दुरूस्ती करण्यात आली नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या नाली बांधकामाची चौकशी करुन अहवाल येईपर्यंत बिल थांबविण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)