देवरी बसस्थानकाच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:26 AM2019-03-07T00:26:28+5:302019-03-07T00:27:08+5:30
येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र ते काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. तर या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र ते काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. तर या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन यांनी केली आहे.
मागील वर्षभरापासून येथील बसस्थानकाचे काम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरु आहे. हे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र कंत्राटदार अंत्यत कासव गतीने बसस्थानकाचे काम करीत आहे. परिणामी मागील वर्षभरापासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकावरील जुन्या टाईल्स पूर्ण काढण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी अद्यापही नवीन टाईल्स लावण्यात आल्या नाही. तर नवीन टाईल्स चांगल्या दर्जाच्या लावण्याऐवजी फुटक्या तुटक्या व निकृष्ट दर्जाच्या लावल्या जात आहे. प्रवशांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या सीट सुध्दा तोडण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी नवीन सीट अद्यापही लावण्यात आले नाही. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बस येईपर्यंत उभेच राहावे लागते. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नरेशकुमार जैन यांनी मुंबई येथील राज्य परिवहन मंडळाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. मात्र अद्यापही या कामाची चौकशी करण्यात आलीे नाही.