नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा
By admin | Published: July 10, 2015 01:49 AM2015-07-10T01:49:51+5:302015-07-10T01:49:51+5:30
कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन...
जयंत देशमुख : कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून धान लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात दुप्पट वाढ होण्यास मदत होईल. माती परीक्षण करून खतांचा समतोल वापर तसेच जैविक कीटकनाशके यांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत आत्माचे राज्य संचालक जयंत देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे कृषी जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते.
याप्रसंगी कृषी उपसंचालक पुणेचे धुमाळ, त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे व तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते.
या वेळी प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, चिंतामन बिसेन, भोजराज पटेल यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील ३०० च्या वर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संचालन कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. $$्निेकाचेवानी : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात कृषी जागृती सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, खंड विकास अधिकारी नारयण जमईवार, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात पी.व्ही. पोटदुखे यांनी, शासनाच्या विविध कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, खरीप हंगाम १५-१६ करिता एम किसान पोर्टल नोंदणी, शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणे, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नगदी पिकांकरिता क्षेत्रात वाढ करणे, बीज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, श्रीपद्धत, कमी खर्चाची शेती, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व पाण्याचे महत्त्व यावर मोहीम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर त्यासाठी सभा होत आहेत, असे सांगितले.
या वेळी प्रवीण महिरे, एन.आर. जमईवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी/वार्ताहर)