आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:30 AM2017-10-13T00:30:04+5:302017-10-13T00:30:25+5:30

Use Organic Food in the Diet | आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

Next
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी चाखली सेंद्रिय भाताची चव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत नव्हती. त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
कारंजा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.१०) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा)े पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी घेण्यात आलेल्या सेंद्रिय तांदळापासून शिजवलेला भात खावू घालण्याच्या कार्यक्र मात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना काळे यांनी, आज आपण डॉक्टरकडे गेलो तर तपासणीसाठी १०० ते २०० रूपये फी लागते. दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर २ ते ४ हजार रूपये कमीतकमी खर्च येतो. स्वस्तातील अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात जावे लागते. स्वत:च्या प्रकृतीकडे आपण खाण्याच्या सवयीमुळे दुर्लक्ष करतो. आज जगभर सेंद्रीय अन्नधान्याची मागणी वाढत आहे. महिलांनी सुध्दा कुटूंब प्रमुखाकडे सेंद्रीय शेतीतील उत्पादीत मालासाठी आग्रह धरावा असे सांगितले.
डॉ.भूजबळ यांनी, सेंद्रिय तांदळाचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात विषमुक्त अन्न काळाची गरज आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवत आहे.
त्यामुळे अशा कीटकनाशक व खतांवर बंदी आली पाहिजे. दररोज अन्नाच्या माध्यमातून विष खाण्यात येत आहे. पोलीस कुटूंबातील सर्वजण निरोगी राहण्यास सेंद्रीय शेतीतून उत्पादीत अन्न खाणेसुध्दा काळाची गरज झाली आहे, असे मत व्यक्त केले.
संचालन आत्माचे सचिन कुंभार यांनी केले. आभार हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्र माला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: Use Organic Food in the Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.