प्रशिक्षणाचा उपयोग बालकामगारांसाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:21 PM2018-01-14T21:21:31+5:302018-01-14T21:21:42+5:30
आई-वडिलानंतर शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे शिक्षकांना आपल्या संस्कृतीत अतिशय मानाचे स्थान आहे. शिक्षकांवर अतिशय जबाबदारीचे काम आहे. शिक्षक हे चांगल्या पिढीचे निर्माते आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आई-वडिलानंतर शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे शिक्षकांना आपल्या संस्कृतीत अतिशय मानाचे स्थान आहे. शिक्षकांवर अतिशय जबाबदारीचे काम आहे. शिक्षक हे चांगल्या पिढीचे निर्माते आहेत. त्यामुळे खºया अर्थाने प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्येक बालकामगार विद्यार्थ्याकरिता पोहोचविता आला तर त्या मुलांचे शैक्षणिक जीवनमान उंचावण्यात मौलिक भर पडेल, असे मत सहायक कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव जीवन बोरकर यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या १६ विशेष प्रशिक्षण केंद्रांतील कार्यरत शिक्षण निर्देशक व व्यावसायिक शिक्षण निर्देशक यांचे तीन दिवसीय शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रम येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडले. या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार हिवारे होते. अतिथी म्हणून जीवन बोरकर, किरण रापतवार, महेंद्र रंगारी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे, दिलीप सोमवंशी, गणेश मेंढे, वशिष्ट खोब्रागडे, दिलीप रामटेके, नितीन डबरे उपस्थित होते.
संचालन गौतम बन्सोड यांनी केले. आभार चेतन वघारे यांनी मानले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना दिलीप नवखरे यांनी मराठी पायाभूत वाचन विकास क्षमता यामधील भाषण, संभाषण ही कृती गटात करुन घेतली. या कृतीचे उद्दिष्टे सांगून शिक्षणाशी काय संबंध जोडता येईल, हे स्पष्ट केले.
सुनील हरिणखेडे यांनी इंग्रजी विषयाचे कृतीयुक्त मार्गदर्शन करुन पीपीटीच्या मदतीने विविध कृती घेऊन वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया कृतीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितले. गणेश मेंढे यांनी प्रेरणा तासिका घेतली. प्रशिक्षणात ३४ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.