करियर घडविण्यासाठी लोकराज्य उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:17 PM2018-09-13T21:17:29+5:302018-09-13T21:19:41+5:30

शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले.

Useful for Lokrajya to create a career | करियर घडविण्यासाठी लोकराज्य उपयुक्त

करियर घडविण्यासाठी लोकराज्य उपयुक्त

Next
ठळक मुद्देरजनी चतुर्वेदी : लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले. येथील नमाद महाविद्यालयात मंगळवारी (दि.११) आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्र मात त्या अध्यक्षस्थानावरु न बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, प्रा.बबन मेश्राम, डॉ.किशोर वासनिक, प्रा.शशिकांत चवरे, डॉ.अर्चना जैन, प्रा.उमेश उदापुरे, प्रा.आशा बघेले, प्रा.पटले व प्रा.भुरे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.चतुर्वेदी यांनी, लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची व उपक्र मांची विस्तृत माहिती दिलेली असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचन करताना लोकराज्य मासिकाला प्राधान्य दयावे असे सांगितले. प्रा.मेश्राम यांनी, शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यने विविध विषयांवर विशेषांक काढले असून हे विशेषांक लोकिप्रय ठरले आहेत. लोकराज्य वाचक अभियानात लोकराज्य घरोघरी पोहोचिवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मोहीम आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविकातून गिते यांनी, लोकराज्य मासिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे तर देशात दुसºया क्र मांकाचे मासिक असून शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती देणारे मासिक आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून लोकराज्यचे नियमीत वाचन करावे व शासनाच्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असे त्यांनी सांगितले. संचालन धम्मदिप मडामे यांनी केले. आभार प्रा.आशा बघेले यांनी मानले. कार्यक्र माला नमाद महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशन
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत दिलेल्या भाषणास आज १२५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमीत्त त्यांच्या ऐतिहासिक भाषणाचे वाचन या निमित्ताने महाविद्यालयात करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो परिषदेतील भाषण आजही प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले. बंधू आणि भगिनींनो असे संबोधन विवेकानंदांनी याच भाषणात केल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी यांचे हे भाषण ऐतिहासिक असून या भाषणाचे पठण प्रत्येकाने करावे असे त्या म्हणाल्या. दरम्यान ‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

Web Title: Useful for Lokrajya to create a career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.