रिक्तपदांमुळे आरोग्य विभागच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:00 AM2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:07+5:30
२६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या उपचारावर होत आहे. अडीचशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असल्याने अशात सर्वसामान्यांच्या उपचाराचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर औषधोपचार केला जातो. त्यांचीच पदे मागील पाच-सहा वर्षांपासून रिक्त आहेत. अ श्रेणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७१ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. ब श्रेणीच्या ५४ पदांपैकी डॉक्टरांची १० पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागच आजारी पडला असून त्याचा रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम होत आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या जात आहेत. पण आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
जिल्हा आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी १ पद, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, अ श्रेणीचे ७१ वैद्यकीय अधिकारी, ब श्रेणीचे ५४ आरोग्य अधिकारी, १७ आरोग्य पर्यवेक्षक, ४४ औषधी निर्माते, १७ प्रयोगशाळा वैज्ञानिक, ६४ आरोग्य सहायक, १९६ आरोग्यसेवक, ४० आरोग्य सहायिका, ३६६ आरोग्यसेविका, ३ कुष्ठरोग तज्ज्ञ व ४० स्वच्छता कामगार या प्रकारे अ ते ड श्रेणीपर्यंत ९१५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात ६५४ पदेच भरण्यात आली आहेत.
२६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या उपचारावर होत आहे. अडीचशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असल्याने अशात सर्वसामान्यांच्या उपचाराचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
२६१ पदांची अद्यापही भरती नाही
- जिल्हा परिषद गोंदियाच्या आरोग्य विभागांतर्गत अनेक वर्षांपासून २६१ पदांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे वेळेवर रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. तसेच परिसरामध्ये घाणीचे वातावरण कायम आहे. या सर्व प्रकारामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. जि.प. गोंदियाच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २५६ उपकेंद्र संचलित आहेत. १३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या शासकीय आरोग्य केंद्रांवर आहे. शासनाने रुग्णांना सेवा देण्यासाठी एक जिल्हा आरोग्य अधिकारी, एक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉक्टरांची २० पदे रिक्त आहेत.