रिक्त पदाने आरोग्य विभाग हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:31+5:302021-04-29T04:21:31+5:30
आमगाव : सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ...
आमगाव : सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, आरोग्य विभाग हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये भरण्याची मागणी अनुकंपाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय हत्तीमारे यांनी केली आहे.
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. वेळवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी झटत आहे. मात्र त्यांनासुध्दा अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका बसत आहे. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सलाइनवर आली आहे. तर दुसरीकडे मागील आठ-दहा वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने ही समस्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे अनुकंपाधारक उमेदवारांमधून भरण्याची अनुकंपाधारक संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष संजय हत्तीमारे यांनी केली आहे.