रिक्त पदांमुळे सिंचन अडले

By admin | Published: November 19, 2015 02:27 AM2015-11-19T02:27:09+5:302015-11-19T02:27:09+5:30

उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे सालेकसा येथील कार्यालयावर सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्याच्या कामाच्या बोझा...

With the vacant posts irrigation has been blocked | रिक्त पदांमुळे सिंचन अडले

रिक्त पदांमुळे सिंचन अडले

Next

तीन तालुक्यांचे कामकाज : अभियंत्याअभावी अनेक कामे रखडली
सालेकसा : उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे सालेकसा येथील कार्यालयावर सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्याच्या कामाच्या बोझा अभियंत्यावर आहे. सोबतच इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने लघु पाटबांरे विभागातील अनेक कामे खोळंबून पडलेली आहेत. कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम पडत आहे.
ग्रामीण भागासाठी शेतकरी वर्गासाठी वरदान ठरणारा लघु पाटबंधारे विभाग मनुष्यबळाअभावी कामकाज व्यवस्थीत करू शकत नाही. याचा फटका सर्व सामान्य लोकांना बसत आहे. याचा प्रत्यय या लघु पाटबंधारे विभागात दिसून येत आहे. येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत एम.सी.नागभिरे यांच्याकडे गोंदिया येथील कार्यालयाच्या सुध्दा अतिरीक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ओझे वाढले आहे. या कार्यालयात सहा अभियंताची पदे मंजूर असून सुध्दा फक्त दोनच अभियंते कार्यरत आहेत. त्यापैकी एक सेवा निवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे फक्त एकच अभियंत्याच्या भरवश्यावर तिन्ही तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभाग चालत आहे. त्यामुळे या विभागाची कामे कशी होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सहा पैकी आर.जी. बेवलकर आणि कनिष्ठ अभियंता आणि आर.व्ही.कपूर शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यापैकी यांनी व्ही.आर.एस.सेवानिवृत्ती चा अर्ज टाकला आहे. त्यांना सेवानिवृत्ती मिळाल्यास फक्त एका शाखा अभियंताच्या भरवश्यावर पाटबंधारे विभागाची कामे चालणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या व्यतिरीक्त वरिष्ठ लिपीकाचे एक पद भरलेले आहे. कनिष्ठ लिपीकाचे तीन पद मंजूर आहेत. परंतु यापैकी एक लिपीक मागील एका वर्षापासून बेपत्ता आहे. अनुरेखक एक पद असून कार्यरत आहे. स्थापत्य सहायक एक पद भरलेले आहे.
शिपाई दोन पद मंजूर असून एकच कार्यरत आहे. महत्वाचे म्हणजे या विभागात अभियंताची पद सर्वात महत्वपूर्ण असून ते पद भरलेले नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यात महत्वपूर्ण प्रकल्पाचे काम रखडलेले आहेत. सालेकसा तालुक्यात मानाकुही व पांढरी येथील तलावाचे काम व नहराचे काम अनेक वर्षापासून थंडबस्त्यात आहेत. प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: With the vacant posts irrigation has been blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.