६५०० फ्रंट लाईन कोरोना योद्धांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:00 AM2020-11-02T05:00:00+5:302020-11-02T05:00:09+5:30
शासकीय कर्मचारी : कोरोनाची लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्यातील तीन मुख्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी तसेच एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय आणि ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. खासगी कर्मचारी : काेरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे डाक्टर, आरोग्य सेविका, व रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. जवळपास ६० खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे.
n अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाची लस लवकरच येणार असून लस आल्यास आधी ती कुणाला द्यायची या दृष्टीने शासन व प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने ६५०० डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठविली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात फ्रंट लाईन याेध्दा म्हणून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. याचीच जाणीव ठेवत जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे.
कोरोना परतीच्या मागार्वर
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. ३९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर २६८४ नवीन बाधितांची भर पडली. रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के असल्याने जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर आहे.
कोरोनाची लस आल्यास ती आधी कुणाला प्राधान्याने द्यायची याकरिता प्रधान सचिवांनी माहिती मागविली होती.जिल्ह्यातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथन लस दिली जाणार आहे त्या दृष्टीने नियोजन केले आहे. - दीपक कुमार मीणा,
जिल्हाधिकारी गोंदिया.
लस येईल तेव्हा...
कोरोनाची लस आल्यास ती सर्व प्रथम आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांना देण्यात येईल.
शासकीय आणि खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा नावाचा डॉटा तयार केला जात आहे.
जिल्हा आरोग्य विभागाकडे हे सोपविण्यात आले असून ते सध्या याचे नियोजन करीत आहे.
कोणाला मिळणार लस?
शासकीय कर्मचारी : कोरोनाची लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्यातील तीन मुख्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी तसेच एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय आणि ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
खासगी कर्मचारी : काेरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे डाक्टर, आरोग्य सेविका, व रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. जवळपास ६० खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे.
जिल्हा स्तरावर काय तयारी सुरू आहे?
जिल्हा आरोग्य विभागाने सध्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर,नर्सेस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा डॉटा संकलीत करणे सुरू केले आहे.
याच अनुषंगाने जवळपास ६५०० जणांच्या नावांची यादी शासनाकडे पाठविली आहे.
जिल्हा आरोग्य विभागात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले जाणार आहे.
लसीचा पुरवठा शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच ती वेळेत कशी देता येईल यासाठी नियोजन सुरू आहे.