तालुक्यात २२ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:00+5:302021-05-08T04:30:00+5:30
नवेगावबांध : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस संसर्ग वाढतच आहे. शहराबरोबरच कोरोनाने खेड्यापाड्यांनाही ...
नवेगावबांध : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण होण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस संसर्ग वाढतच आहे. शहराबरोबरच कोरोनाने खेड्यापाड्यांनाही आपल्या कवेत घेतले आहे. शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जातात. याअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यात आतापर्यंत २२ हजार ५८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांचा जो आलेख मार्च-एप्रिल महिन्यात वाढला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन मेपर्यंत आरोग्यवर्धिनी केंद्र, केशोरी येथे सर्वात जास्त ३७३३ तर सर्वात कमी धाबेपवनी १८५९ नागरिकांचे लसीकरण झाले. नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात ६१८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १८५५६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३९९६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. असे एकूण आतापर्यंत तालुक्यात २२ हजार ५८२ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. नागरिकांनी आपल्या मनातील भीती दूर करून कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे. लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळावा, यासाठी शिक्षकही आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये लसीकरणासंदर्भात जे काही चुकीचे गैरसमज आहेत ते दूर करण्याची गरज असून जेणेकरून नागरिक लसीकरणाला प्रवृत्त होतील. या यासाठी लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. जास्तीत जास्त लसीकरण होणे ही आता काळाची गरज आहे.