पळसगाव/राका येथे ४३० नागरिकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:57+5:302021-05-31T04:21:57+5:30

लसीकरण मोहीम सरपंच भारती लोथे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली. मुख्याध्यापक एस.आर. फुंडे, ...

Vaccination of 430 citizens at Palasgaon / Raka | पळसगाव/राका येथे ४३० नागरिकांना लसीकरण

पळसगाव/राका येथे ४३० नागरिकांना लसीकरण

Next

लसीकरण मोहीम सरपंच भारती लोथे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली. मुख्याध्यापक एस.आर. फुंडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, भास्कर नागपुरे, सहायक शिक्षक नितीन अंबादे व एस.टी. कापगते यांनी जनजागृती करुन लोकांच्या मनातील गैरसमज दूर केले व एकाच आठवड्यात ४५ वर्षांवरील ५८५ पैकी ४३० लोकांनी लसीकरण करवून घेतले. लसीकरण केंद्राला गटविकास अधिकारी एम. एस. खुणे व तालुका आरोग्य अधिकारी हर्षवर्धन मेश्राम यांनी भेट देऊन पळसगाव व भदुटोलावासीयांचे कौतुक केले. तसेच एका आठवड्यात ४३० लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचेही कौतुक केले व १०० टक्के लसीकरण करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

लसीकरणासाठी सरपंच लोथे, उपसरपंच सुनील चांदेवार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कापगते, सविता मल्लेवार, कुंदा सावरकर, पूजा कापगते, शोभा येरपुडे, कुवरलाल मेश्राम, अरविंद सलामे, मुख्याध्यापक एस. आर. फुंडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, भास्कर नागपुरे, नितीन अंबादे, एस. टी. कापगते, वैद्यकीय अधिकारी स्वाती खेडेकर, आरोग्य सेवक शशीकांत नेवारे, दिघोरे, ग्रा.पं.कर्मचारी मुकेश कापगते, बालू बावणकुडे, प्यारेलाल कान्हेकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Vaccination of 430 citizens at Palasgaon / Raka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.