सलग तिसऱ्या दिवशी ६० कर्मचाऱ्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:04+5:302021-01-21T04:27:04+5:30
गोंदिया : कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे. याअंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ...
गोंदिया : कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे. याअंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी ६० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली.
यावेळी शहरातील वरिष्ठ फिजिशियन डॉ. बाहेकर, अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रोफेसर डॉ. मनोज ताडपल्लीवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, प्रा. संजय माहुले, सांख्यिकी अधिकारी तलमले, कोविन ॲप हाताळणारे तंत्रज्ञान कौशल स्टाफ मनीष मदने, पीएचएन रूपाली टोणे, अनू नांदणे, विनय अवस्थी उपस्थित होते. प्रथम लस डॉ. विजय बाहेकर यांना देण्यात आली. गोंदिया शहरातील बहुतांश खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लसीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. डॉ. बाहेकर, डॉ. जायस्वाल, डॉ. अविनाश येरणे, डॉ. त्रिपाठी, राष्ट्रीय बालचिकित्सा अभियान ‘आरबीएसके’चे नोडल अधिकारी डॉ. संजय बिसेन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील विशाल पवार, ब्राह्मणकर यांनासुद्धा लसीकरण करण्यात आले. तिरोडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तालुका आरोग्याधिकारी डॉ. शीतल मोहने या स्वत: लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. देवरीचे डॉ. गुल्हाणे व डॉ. ललित कुकडे यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. नोडल अधिकारी डॉ. पांचाळ राज्यपातळीवर समन्वय व संनियंत्रण करीत आहेत.
......
लसीकरणात काेविन ॲपचा अडथळा
लसीकरण मोहिमेदरम्यान कोविन ॲपमध्ये अडथळा येत असल्याने अडचण येत आहे. बुधवारीही लसीकरणादरम्यान ॲपमध्ये एरर आल्याने अडचण निर्माण झाली होती. डॉ. नितीन कापसे यांनी आयटी संगणक तज्ज्ञ अश्विनी नायर यांच्याशी राज्यपातळीवर संपर्क साधून ती दूर केली.