प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:57+5:302021-03-23T04:30:57+5:30
गोठणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार (दि. २२)पासून कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात केली आहे. तरी ज्यांचे वय ६० वर्षे ...
गोठणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार (दि. २२)पासून कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात केली आहे. तरी ज्यांचे वय ६० वर्षे आहे व ४५ ते ५९ वय असलेल्यांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले यांनी कळविले आहे.
पहिल्याच दिवशी एकूण ४० लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. लस घेण्याकरिता येताना सोबत आधारकार्ड किंवा पॅनकार्ड सोबत आणावे, जेवण केल्याशिवाय लस घेऊ नये, ज्यांना बीपी शुगर आजार आहे, त्यांनी न चुकता लसीकरणाचा लाभ घ्यावा. लस घेतल्यानंतर काहींना ताप, अंगदुखी वाटते, एक किंवा दोन दिवस राहते. केंद्रावर दिल्या गेलेल्या औषधाने बरे वाटते. म्हणून मनात कोणतीही शंका-कुशंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे. त्यांनतर पुन्हा २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. लसीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी माजी जि. प. सदस्य रतीराम राणे, डॉ. आशीष बोदेले, रमेश नाईक, आरोग्य सहायक विश्वास, डॉ. अंबर मडावी, गौरव टेंभेकर, आरोग्य सेवक कांबळे, वघारे, सेविका राऊत, साखरे, परिचारिका रॉय, टेक्निशियन चांदेकर, आरोग्य सहायक पारधी, वाहनचालक खेडीकर उपस्थित होते.