जिल्हयात ०.५ सिरिंजनेच होत आहे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:42+5:302021-09-14T04:33:42+5:30

कपिल केकत गोंदिया : देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून शासनाकडूनच कोवॅक्सिन व कोव्हिशिल्ड लस तसेच ०.५ ...

Vaccination is being done with only 0.5 syringes in the district | जिल्हयात ०.५ सिरिंजनेच होत आहे लसीकरण

जिल्हयात ०.५ सिरिंजनेच होत आहे लसीकरण

googlenewsNext

कपिल केकत

गोंदिया : देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून शासनाकडूनच कोवॅक्सिन व कोव्हिशिल्ड लस तसेच ०.५ सिरिंजचा पुरवठा केला जात आहे. ०.५ मिलीच्या या सिरिंजला ऑटो डिस्पोजेबल (एडी) सिरिंज म्हटले जाते कारण ती फक्त एकदाच वापर करून फेकावी लागते. लसींसोबतच शासनाकडून या सिरिंजचा पुरवठा केला जात आहे. मात्र, देशात सध्या लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून दिवसाला कोट्यवधींच्या घरात लसीकरण केले जात आहे. अशात एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण होत असतानाच सिरिंजचाही तुटवडा जाणवू लागला आहे. मध्यंतरी सिरिंजच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातही लसीकरणावर परिणाम जाणविला होता. मात्र, आता सिरिंजचा पुरवठा सुरळीत झाला असून जिल्ह्यात सध्या ०.५ मिली सिरींजनेच लसीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे, सिरिंजच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्याने जिल्हा वार्षिक नियोजनातून १ मिलीच्या २५०००० सिरिंज खरेदी केल्या आहेत. जेणेकरून शासनाकडून सिरिंजचा पुरवठा करताना काही अडचण आल्यास या सिरिंजचा वापर करून लसीकरण सुरू ठेवले जाईल.

--------------------------------------

काय आहे एडी सिरिंज ?

एडी सिरिंजलाच ऑटो डिस्पोजेबल सिरिंज म्हटले जाते. लसीकरणात सध्या ०.५ मीमी सिरिंजचा वापर केला जात आहे. या सिरिंजमध्ये एकदा लस लावल्यानंतर दुसऱ्यांदा त्याचा वापर करता येत नाही. कारण, सिरिंजमधील द्रव्य पुढे ढकलण्यासाठी वापरली जाणारी दांडी एकदा वापरल्यानंतर लॉक होते.

-----------------------------

२ सीसी सिरिंज कशी असते ?

- २ सीसी सिरिंजही साधारण सिरिंज सारखीच असून तिच्यात २ मिली. पर्यंत लसीचा डोस घेता येतो.

- तसेच या सिरिंजमध्ये ऑटो लॉकिंग होत नसल्याने तिचा दुसऱ्यांदा वापर करता येतो, मात्र ते धोकादायक असल्याने तसे केले जात नाही.

-------------------------

जिल्ह्याला रोज किती लागतात सिरिंज ?

जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहीम जोमात राबविली जात असून दिवसाला १५००० ते १६००० पर्यंत नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू असून आतापर्यंत ८७८६८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

---------------------------

वेस्टेज वाढले

जिल्ह्यात सध्या शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या ०.५ सिरिंजनेच लसीकरण केले जात आहे. एका व्यक्तीला ०.५ मिलीचाच डोस दिला जात असून या सिरिंजमध्ये लसीचा तेवढाच डोस येतो. मात्र, अन्य काही कारण असल्याने सध्या १.२६ टक्के एवढेच वेस्टेजचे प्रमाण आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात आले आहे.

-------------------------------

लवकरात लवकर दुसरा डोस घ्या

जिल्ह्यात लसीकरण जोमात सुरू असून ६७ टक्के लसीकरण झाले आहे. मात्र, यामध्ये दुसरा डोस फक्त १६ टक्के नागरिकांनीच घेतला आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेण्याची गरज असून संभाव्य तिसऱ्या लाटेपासून सुरक्षेसाठी लवकरात लवकर आपला दुसरा डोस घ्यावा.

- डॉ. नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

Web Title: Vaccination is being done with only 0.5 syringes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.