झरपडा येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:35+5:302021-04-28T04:31:35+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला अंतर्गत येणाऱ्या झरपडा या गावात सध्या पंधरापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या ...
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला अंतर्गत येणाऱ्या झरपडा या गावात सध्या पंधरापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली हे रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तालुक्यात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने झरपडा गावातही त्याचा प्रकोप वाढू नये म्हणून येथील सरपंच कुंदा डोंगरवार यांच्या पुढाकाराने गावात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्प्पा म्हणून २४ एप्रिल रोजी गावातील शंभर लोकांना लस देण्यात आली. उर्वरित लोकांनासुद्धा लस मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे सरपंच डोंगरवार यांनी सांगितले. मनात कोणतीही भीती व शंका न बाळगता गावातील सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी करावी, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार यांनी कळविले आहे.