‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने जिल्ह्यात लसीकरण जोमात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:08+5:302021-07-03T04:19:08+5:30

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर माजविला असतानाच आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या रूपाने गोंधळ माजविला आहे. ...

Vaccination in the district due to the threat of 'Delta Plus' () | ‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने जिल्ह्यात लसीकरण जोमात ()

‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने जिल्ह्यात लसीकरण जोमात ()

Next

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर माजविला असतानाच आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या रूपाने गोंधळ माजविला आहे. डेल्टा प्लसच्या धास्तीने आता राज्य शासनाचे टेन्शन वाढविले असून यामुळेच आता नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम जोमात राबविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात आली असून आतापर्यंत ४४००१३ लाख नागरिकांचे म्हणजेच ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरण मोहीम जोमात राबविली जात असतानाच १८-४४ गटातील तरूणाई लसीकरणासाठी सरसावली असून लसीकरण केंद्रांवर त्यांचीच गर्दी दिसून येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून डेल्टा प्लसला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे.

---------------------------------

जिल्ह्यातील एकूण लसीकरण - ४४००१३

- पहिला डोस- ३४९१२६

- दोन्ही डोस - ९०८८७

---------------------

कोणत्या तालुक्यात किती? (ग्राफ)

पहिला डोस दोन्ही डोस

गोंदिया ६६४१५ १५१९३

आमगाव ३०२३३ ८५८५

तिरोडा ४१४५१ ५८२६

गोरेगाव २७९७६ ७४०७

सालेकसा २४९८९ ७०९०

देवरी ३२२१३ ६१००

सडक-अर्जुनी ३४७९८ ७०८५

अर्जुनी-मोरगाव ३६९६३ १३०२७

--------------------------------

१८-४४ वयोगटात १२.८८ टक्के

राज्य शासनाने १८-४४ वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणासाठी वाट बघत असलेली तरूणाई सरसावल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच लसीकरण केंद्रांवर तरूणांची गर्दी असून आतापर्यंत ८०५४० तरूणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात, ७३४६२ तरूणांनी पहिला डोस घेतला असून ७०७८ तरूणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, १२.८८ टक्के तरूणांनी लस घेतली आहे.

-------------------------------

सालेकसा तालुका लसीकरणात माघारलेला

जिल्ह्यातील स्थिती बघता आतापर्यंत ४४००१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात गोंदिया तालुका ८१६०८ नागरिकांचे लसीकरण करून आघाडीवर आहे. मात्र सालेकसा तालुका ३२०७९ एवढे सर्वात कमी लसीकरण करून माघारलेला असल्याचे दिसत आहे.

Web Title: Vaccination in the district due to the threat of 'Delta Plus' ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.